For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहा खाणपट्ट्यांचा होणार लवकरच लिलाव : मुख्यमंत्री

12:57 PM Jan 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सहा खाणपट्ट्यांचा होणार लवकरच लिलाव   मुख्यमंत्री
Advertisement

सरकारी डंप पॉलिसी अंतर्गत लिलावाचा पहिला टप्पा पूर्ण  

Advertisement

पणजी : पुढील महिन्यात सहा खाणपट्ट्यातील पडून असलेल्या मालाचा लिलाव करण्यात येणार आहे. सरकारने यापूर्वीच 12 खाणपट्ट्यांचा लिलाव केला असून, यामधील 5 खाणपट्ट्यांचे काम सुरू झाले आहे. आणखी चार पट्ट्यांचे काम लवकरच सुरू होईल. सरकारी डंप पॉलिसी अंतर्गत लिलावाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली. पर्वरी येथील मंत्रालयात काल, शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर खाणपट्ट्यातील सद्य:स्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदींसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी 54 टक्के निधी नोव्हेंबर अखेरीस वापरण्यात आला आहे. आर्थिक वर्षातील मार्च 2026 पर्यंत मंजूर निधीपैकी 95 टक्के वापरण्यात येईल. बैठकीत अर्थ संकल्पात मांडलेल्या विविध तरतुदींचा आढावा घेण्यात आला.

Advertisement
Advertisement
Tags :

.