For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाच शार्पशूटर्सना दिल्लीत अटक

06:08 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाच शार्पशूटर्सना दिल्लीत अटक
Advertisement

गँगस्टर काला जाठेडीच्या विवाहापूर्वी मोठी कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हरियाणातील कुख्यात गुंड काला जाठेडी आणि लेडी डॉन अनुराधा चौधरी उर्फ मॅडम मिंज यांच्या विवाहाच्या दोनच दिवस आधी पाच शार्पशूटर्सना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने द्वारका परिसरातून पाचही शूटर्सना अटक केली आहे. त्यांचा काला जाठेडी टोळीशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून विदेशी शस्त्रे जप्त केली असून त्यात पीएक्स 30 मेड इन चायना पिस्तूल, पी. ब्र्रेटा मेड इन इटली पिस्तूल, पॉइंट 32 पिस्तूल आणि अनेक काडतुसे यांचा समावेश आहे. काला जाठेडी आणि अनुराधा चौधरी यांचा विवाह 12 मार्चला होणार आहे. त्याआधी हरियाणातील रोहतकमध्ये मोठे रक्तरंजित टोळीयुद्ध टळल्याचा दावा केला जात आहे.

Advertisement

काला जाठेडीदीच्या लग्नापूर्वी त्याच्या सांगण्यावरून हरियाणातील रोहतकमध्ये अतिशय रक्तरंजित टोळीयुद्ध होणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्याची लिंक हरियाणा कारागृह आणि दिल्लीच्या तिहार तुऊंगाशी जोडलेली आहे. यासंबंधी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दिल्लीतील द्वारका परिसरातून पाचही शूटर्सना अटक करण्यात आली. यात जाठेडीचे हस्तक आणि व्यावसायिक गुन्हेगारांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी राहुल बाबा आणि प्रवीण दादा हे काला जाठेदीसह हरियाणात दारूची दुकाने चालवत होते. या व्यवसायावरून त्याचे दुसऱ्या टोळीतील अजयसोबत भांडण झाल्यानंतर अजयची त्याच्या प्रतिस्पर्धी टोळी नीरज बवाना-हिमांशू उर्फ भाऊशी जवळीक झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Advertisement
Tags :

.