महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हासनजवळील भीषण अपघातात सहा ठार

10:10 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारची कंटेनरला समोरून जोराची धडक

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

कारने कंटेनरला समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात लहान मुलासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. हासन शहराबाहेरील राष्ट्रीय महामार्ग 75 वर इचनहळ्ळीजवळ रविवारी सकाळी ही घटना घडली. नारायणस्वामी, सुनंद, रविकुमार, नेत्रा, चेतन आणि कारचालक राकेश अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण चिक्कबळ्ळापूर जिल्ह्याच्या होस्कोटे तालुक्यातील अंदरहळ्ळी आणि देवनहळ्ळीजवळील कारहळ्ळी येथील आहेत. मंगळूर येथे उपचार घेत असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कारमधून गेलेले कुटुंबीय सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रकृतीची विचारपूस करून गावाकडे परतत होते. दरम्यान, कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली. यानंतर बाजूच्या रस्त्यावर जाऊन कंटेनरला जोराची धडक दिली. अपघात इतका भयंकर होता की चालकासह कारमधील सर्वजण जागीच ठार झाले आहेत. या धडकेने कारचा पूर्ण चुराडा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच हासन वाहतूक स्थानकाच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर व्रेनच्या सहाय्याने कार उचलून मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून याप्रकरणी हासन वाहतूक पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख महमद सुजीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

रामनगरमध्ये बस-दुचाकी अपघात; दोन ठार

सरकारी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जागीच ठार झाले. रामनगर जिल्ह्याच्या कनकपूर रस्त्यावरील सब्बकेरे गेटजवळ रविवारी दुपारी ही घटना घडली. अपघातात दुचाकीस्वार आणि महिलेचा मृत्यू झाला असून दोघेही मागडी तालुक्यातील होन्नावर पाळ्या येथील रहिवासी आहेत. रामनगर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article