For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंग्राळी बुद्रुकमध्ये सहा गवत गंजींना आग

10:19 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
कंग्राळी बुद्रुकमध्ये सहा गवत गंजींना आग
Advertisement

शेतकऱ्यांचे 75 हजार रुपयांचे नुकसान

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक

येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समोरील पाटील बंधूंच्या खुल्या जागेत असलेल्या सहा गवत गंजींना सोमवारी दुपारी 2 वाजता अचानक आग लागून 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र गवत जळून खाक झाल्यामुळे जनावरांना काय घालावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पाटील बंधूंच्या खुल्या जागेमध्ये चेतन मल्लाप्पा चव्हाण, प्रसाद शिवाजी चव्हाण, संजय तम्मान्ना पाटील यांचे प्रत्येकी एक ट्रॉली पिंजर तर गणपत गोविंद निलजकर, बाळू परशराम अष्टेकर, परशराम गुंडू पाटील यांचे प्रत्येकी 2 ट्रॉली पिंजर ठेवले होते. सोमवारी भरदुपारी या गवत गंजींना आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाडीला कळविले. अग्निशमनचे जवान तातडीने दाखल होऊन आग आटोक्यात आणली. गवत गंज्यांच्या आजूबाजूला नागरी वस्ती आहे. यामुळे नागरिकांची आग आटोक्यात आणण्यासाठी एकच धावपळ उडाली. यावेळी राजू चव्हाण या सामाजिक कार्यकर्त्यांने अग्निशमनला फोनवरून कळविल्यानंतर लगेच गाडी आली व पाण्याच्या माऱ्याने आग आटोक्यात आणली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मंजूर करून दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे. तलाठी यांचे सहाय्यक बाळू पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, तानाजी पाटील, वंदना चव्हाण, नवनाथ पुजारी, सद्दाप्पा राजकट्टी आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.