महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहशतवाद्यांना मदत करणारे सहा सरकारी कर्मचारी बडतर्फ

06:03 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाच पोलिसांसह एका शिक्षकाचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

Advertisement

जम्मू काश्मीर प्रशासनाने देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल 6 सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. यामध्ये 5 पोलीस आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. हे सर्वजण अमली पदार्थांच्या व्यापारात आणि टेरर फंडिंगमध्ये गुंतलेले होते. संबंधितांवर ईडी आणि गुप्तचर संस्था या सर्वांवर लक्ष ठेवून होते. या सर्वांचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याची पुष्टी झाल्यानंतर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.

काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम 311 (2) (सी) चा वापर केला. कारवाई करण्यात आलेले सर्व सहाही कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय आणि त्याच्याशी संबंधित दहशतवादी संघटनांच्या नार्को-टेरर नेटवर्कचा भाग असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. बडतर्फ कर्मचाऱ्यांमध्ये हेड कॉन्स्टेबल फाऊख अहमद शेख, सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल सैफ दिन, खालिद हुसैन शाह, इर्शाद अहमद चालकू, कॉन्स्टेबल रहमत शाह आणि शिक्षक नजम दिन यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती किंवा राज्यपालांना सामान्य प्रक्रियेचा अवलंब न करता कोणत्याही कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार आहे. एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याचे सार्वजनिक सेवेत कार्यरत राहणे हे राज्याच्या सुरक्षेला धोका पोहोचवत असल्यास घटनेतील कलमांचा आधार घेत संबंधितांवर कारवाई केली जाते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article