महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सहकारातून समृद्धीची सहा दशकांची वाटचाल

12:36 PM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांनी जागविला इतिहास : पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी घातला गोव्याच्या सहकारक्षेत्राचा पाया

Advertisement

पणजी  : गोवा एक सुमधुर समुद्रकिनारा आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेले राज्य आहे. अशा या राज्यात सहकार क्षेत्रतही एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सहकार हे एकत्रितपणे काम करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक आणि सामाजिक फायदे देणारे प्रभावी माध्यम बनत चालले आहे. गोव्यातील सहकारी संस्थांनी स्थानिक समुदायांचे जीवनमान उंचावण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अशा या सहकार चळवळीची सहा दशके म्हणजेच 60 वर्षे उद्या पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांच्याशी काल बुधवारी दैनिक तऊण भारतने संवाद साधला.

Advertisement

विकासाचे भाऊसाहेबांचे स्वप्न

गोव्यातील सहकार क्षेत्राची सुऊवात 1963 मध्ये झाली असली तरी खऱ्या अर्थाने 2 फेब्रुवारी 1964 मध्ये सहकार बँक कार्यरत झाली. गोव्याला सहकार क्षेत्रात उंच स्तरावर नेण्याचे स्वप्न गोव्याचे पाहिले मुख्यमंत्री स्व. दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर यांचे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्राची वाटचाल खऱ्या अर्थाने सुरू झाली. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे सहकार क्षेत्राची भरभराट झाली होती तशीच गोव्याची व्हावी असे बांदोडकर यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न देखील केले, असे फळदेसाई म्हणाले.

 भाऊसाहेबांनी स्थापल्या सोसायट्या 

गोव्यात पंचायत पातळीवर विकास सेवा सोसायटी स्थापन करण्यात आल्या. ज्या माध्यमातून विविध सुविधा लोकांना प्रधान करण्यात आल्या. बांदोडकर यांनी स्थापन केलेल्या 38 विकास सेवा सोसायटी आजही गोव्यात कार्यरत आहे. त्यात सहकार भंडार, संजीवनी साखर कारखाना यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे आज  सहकारी बँकेच्या 54 शाखा गोव्यात आहेत. ईडीसी, सहकार भंडार, गोवा डेअरी, गोवा बागायतदार यांना सहकारी बँकच्या माध्यमातूनच अर्थ पुरवठा केला जात आहे, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.

नव्वदच्या दशकात सहकारक्षेत्राची नुकसानी

गोव्यात 1994-95 पर्यंत सहकारी बँक बऱ्या चालत होत्या. अनेक अडचणी आल्या, आव्हाने, कर्जाचा भार पेलून देखील या कालावधीत उत्तम कार्य सुरु होते. राष्ट्रीय पुरस्कार या बँकांनी पटकावले होते. त्यानंतच्या 20-25 वर्षांच्या काळात मात्र अनेक घडामोडी घडल्या. भरपूर नुकसानीस तोंड द्यावे लागले. ज्या पद्धतीने बँकेचा कारभार चालायला हवा होता तसा चालला नाही. सुऊवातीच्या काळात सहकार क्षेत्रात काही अडथळे आले, पण हळूहळू याला स्थिरता मिळाली. राज्यातील लोकांना, गरिबांना, शेतकऱ्यांना फायदा करून देणे हाच सहकार क्षेत्राचा उद्देश्य होता, असे फळदेसाई म्हणाले.

 सहकारी बँका महत्वाचा स्तंभ

आज गोव्यातील सहकारी बँका वित्तीय समावेशाचा एक महत्त्वाचा स्तंभ बनल्या आहेत, असे सांगून ते म्हणाले की या बँकांनी लहान शेतकऱ्यांना आणि व्याप्राऱ्यांना सोपे कर्ज मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर, ग्राहक सहकारी संस्थांनी स्थानिक उत्पादकांच्या उत्पादनांना वाव देत, बाजारात अधिक स्पर्धात्मकता आणली आहे. गोव्यातील सहकारी चळवळ मोठ्या प्रमाणावर विविध क्षेत्रांमध्ये पसरली आहे. कृषी, दुग्ध उत्पादन, मासेमारी, वस्त्राsद्योग यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये सहकारी संस्थांनी कार्यरत राहून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट केले आहे. सहकार क्षेत्राची यशस्वी वाटचाल ही केवळ आर्थिक लाभावरच नाही, तर सामाजिक परिवर्तनावरही अवलंबून आहे. आधुनिक काळात गोव्यातील सहकार क्षेत्राने तंत्रज्ञानाचा समावेश करून अधिक प्रभावी बनण्याची दिशा घेतली आहे. डिजिटल व्यवहार, ऑनलाइन मार्केटिंग आणि इतर नविन तंत्रज्ञानाच्या मदतीने सहकारी संस्थांनी त्यांची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवली आहे. यामुळे त्यांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.

पारदर्शकता हा सहकाराचा आत्मा 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा मोहिमेत सहकार क्षेत्राचा खारीचा वाटा आहे. सरकारच्या विविध सरकारी योजना राज्यातील तळागळात पोहचाव्यात यासाठी सहकार खाते प्रयत्न करत आहे. शेतकरी, ग्रामीण भागातील लोक, महिला बचत गट यांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही कार्य करत आहोत. सहकार क्षेत्र हे मुळात शेतकऱ्यांचेच असून त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांच्यातर्फे आवश्यक त्या सगळ्या सुविधा आणि मदत वेळेवर केली जात आहे. गोव्यातील सहकार क्षेत्राची वाटचाल निश्चितच प्रेरणादायी आहे. येणाऱ्या काळात गोव्यातील सहकारी संस्थांचा विकास होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. विश्वासार्हता व पारदर्शकता हा सहकाराचा आत्मा जपला पाहिजे, असे फळदेसाई यांचे म्हणणे आहे.

सहकार क्षेत्रात निस्वार्थी सेवा देणारे : उल्हास फळदेसाई 

2012 मध्ये सहकार क्षेत्र आपल्या वाईट अवस्थेत होते. सुमारे 125 ते 130 कोटी नुकसान झाले होते. तेव्हा स्व. मनोहर पर्रीकर यांनी सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. उल्हास फळदेसाई यांच्याकडे विश्वासाने जबाबदारी दिली. सहकार क्षेत्र नुकसानीत होते म्हणून फळदेसाई यांची पद स्वीकारण्याची तयारी नव्हती परंतु पर्रीकर यांनी दाखविलेल्या विश्र्वासामुळे त्यांनी जबाबदारी स्वीकारली. 2012 मध्ये ते एमपीटीमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यांची इकॉनॉमिक्स पदवी, एलएलबी हा सगळा अभ्यास या प्रवासात त्यांना उपयोगी पडला. त्यांनी आपली 35 वर्षे सहकार क्षेत्राला दिली आहेत. याबरोबरच अनेक सामाजिक कार्यात त्यांचा वाटा आहे. 2012 मध्ये जेव्हा त्यांनी बँकेचे अध्यक्षपद स्वीकारले तेव्हा 2017 पर्यंत सहकार बँक प्रॉफिटमध्ये आणण्याचे त्यांचे ध्येय होते. परंतु राज्यातील खाण बंदीचा सहकार क्षेत्राला मोठा फटका बसला. राज्यातील सहकारी बँका व सहकारी पतसंस्थांनी खाण व्यवसायाशी संलग्न असलेल्या तसेच खाण अवलंबित व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात कर्जे दिली होती. त्यामुळे बँकेला रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले. परंतु खंबीरपणे आणि निस्वार्थी सेवा केली, उच्च विचारसरणी असली तर कुठलीही गोष्ठ अशक्य नाही. अशी फळदेसाई यांची मानसिकता होती. प्रत्येक पद्धतीचे कष्ठ घेत आज सहकार क्षेत्र उंच भरारी घेत आहे. 2020-21 पासून सहकारी बँका प्रॉफिटमध्ये आल्या आहेत. भविष्यासाठी  2023-24 ते 2028-29 या वर्षांचे नियोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article