For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिक्स क्रिकेट अकादमीचा 30 धावांनी विजय

10:35 AM Jul 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
सिक्स क्रिकेट अकादमीचा 30 धावांनी विजय
Advertisement

बेळगावची मानसी मोरे सामनावीर

Advertisement

बेळगाव : बेंगळूर येथे आरआरसी महिलांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामान्यात सिक्स क्रिकेट अकादमीने हेरनोस संघाचा 30 धावांनी पराभव करून 2 गुण मिळविले. बेळगावच्या मानसी मोरेने अष्टपैलू कामगिरी करत सामनावीर पुरस्कार मिळविला. सिक्स क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 9 गडीबाद 162 धावा केल्या. या स्पर्धेत बेळगावच्या मानसी मोरे 6 चौकारासह 52 चेंडूत 55, इंदूने नाबाद 27, समिक्षा जेडीने 18, हर्षिता के.ने 15, तर निसरंगा के.ने 9 धावांचे योगदान दिले. हेरनोसतर्फे गोलंदाजी करताना प्रिती सिंगने 38 धावात 2, रेश्मा राजने 22 धावात 2, सामविद्या अरूणने 26 धावात 2 तर अंजलीने 1 गडीबाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना हेरनोस संघाने 25 षटकात 8 गडीबाद 132 धावा केल्या. त्यात निशीका चौरीने 2 चौकारासह 21, स्वजयाने 2 चौकारासह 20, एम.भास्करने 18, तर अन्नपूर्णाने 13 धावा केल्या. सिक्स अकादमीतर्फे साक्षीने 16 धावात 2, तर पुजीता, समिक्षा व मेघना, रोमा यांनी प्रत्येकी 1 गडीबाद केला. या सामन्यात 55 धावा करणाऱ्या बेळगावच्या मानसी मोरेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisement
Advertisement
Tags :

.