एका दिवसात 6 शतके; वनडे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच विक्रम!
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवार दि. 27 सप्टेंबर हा दिवस वनडे क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. एकाच दिवशी खेळल्या गेलेल्या तीन वेगवेगळ्या वनडे सामन्यांमध्ये तब्बल सहा फलंदाजांनी शतके झळकावली. यापूर्वी एका दिवसात पाच शतके होण्याचा विक्रम झाला होता. मात्र, रविवारी हा विक्रम मोडीत निघाला.
तिऊवनंतपुरम येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वनडेत शतकांची हॅट्ट्रिक पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजच्या जस्टिन ग्रीव्ह्सने 101 धावांची खेळी करत वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्यानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने 110 धावांची शानदार खेळी केली तर विराट कोहलीने नाबाद 139 धावांची तुफानी खेळी करत भारताला आठ गडी राखून विजय मिळवून दिला.
जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यातही धावांचा पाऊस पडला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने 103 धावा तर डेव्हिड मिलरने नाबाद 142 धावांची धडाकेबाज खेळी केली.
दरम्यान, लंडनमधील द ओव्हल मैदानावर इंग्लंडचा सलामीवीर टॉम बॅन्टनने श्रीलंकेविऊद्ध 126 धावांची खेळी करत आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्यामुळे 27 सप्टेंबर रोजी तीन सामन्यांमध्ये एकूण सहा शतके पूर्ण झाली. विराट कोहली, शुभमन गिल, जस्टिन ग्रीव्ह्स, टेम्बा बवुमा, डेव्हिड मिलर आणि टॉम बॅन्टन हे या ऐतिहासिक विक्रमाचे शिल्पकार ठरले. त्यामुळे 27 सप्टेंबरचा हा दिवस वनडे क्रिकेटमधील ‘शतकांचा रविवार’ म्हणून कायम स्मरणात राहणार आहे.