कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

म. ए.समितीच्या सहा खटल्यांची विविध न्यायालयात सुनावणी

10:45 AM Nov 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : मराठा क्रांती मोर्चा, 2017, 2018 आणि 2021 सालातील महामेळावे, लोकसभा निवडणूक काळात आचारसंहिता भंग, कोरोनाकाळात मराठी कागदपत्रांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या सहा खटल्यांची सुनावणी मंगळवार दि. 18 रोजी येथील वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये झाली. मराठा क्रांती मोर्चावेळी विक्रीसाठी आणलेल्या टी शर्टवर सीमाप्रश्नासंदर्भातील स्लोगन छापल्या प्रकरणी शहाजीराजे भोसले व मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्याविरोधात खडेबाजार पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी सुरू आहे.

Advertisement

मंगळवारी या खटल्याची तिसरे जेएनएफसी न्यायालयात सुनावणी झाली. 2017, 2018 आणि 2021 मध्ये मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने परवानगी नसताना मेळावा घेतल्या प्रकरणी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश शिरोडकर, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, शुभम शेळके, धनंजय पाटील, मदन बामणे, संतोष मंडलिक यांच्यासह 31 जणांविरोधात टिळकवाडी पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी सुरू आहे. 2017 च्या महामेळावा खटल्यात 6 जणांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून घेण्यात आले. आता या खटल्याची पुढील सुनावणी 1 डिसेंबर रोजी होणार आहे. 2018 व 2021 या खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून चौथे जेएनएफसी न्यायालयात हे खटले सुरू आहेत.

Advertisement

निवडणूककाळात म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धर्मवीर संभाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करून अर्ज भरण्यात आला होता. त्यामुळे आचारसंहिता भंग केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी महादेव पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, शुभम शेळके व इतरांवर गुन्हा दाखल केल्याने या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मंगळवारीच्या सुनावणीला साक्षीदार गैरहजर राहिल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

कोरोनाकाळात मराठी कागदपत्रांसाठी मोर्चा काढल्याने पोलिसांनी माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, मालोजी अष्टेकर, शुभम शेळके, धनंजय पाटील, मदन बामणे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने या खटल्याची पाचवे दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मंगळवारची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या सहा खटल्यांचे कामकाज अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. मल्लेशी बोंद्रे, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. अश्वजित चौधरी, अॅड. रिचमॅन रिकी पहात आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article