For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सीतारामन यांची गांधी यांच्यावर टीका

06:49 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
सीतारामन यांची गांधी यांच्यावर टीका
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आयडीबीआय या प्रसिद्ध बँकेसंबंधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या बँकेतील केंद्र सरकारच्या समभागांची निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाला राहुल गांधी यांनी विरोध केला आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे या बँकेची मोठी हानी झाली, असे गांधी यांचे म्हणणे आहे. तथापि, ज्या प्रमाणे राहुल गांधी राफेल युद्ध विमान प्रकरणात खोटे ठरले, तसेच आयडीबीआय बँकेच्या संदर्भातही खोटे ठरतील, असा विश्वास सीतारामन यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

काँग्रेसच्या मागच्या 10 वर्षांच्या काळात बँकांना वारेमाप कर्जे देण्यास भाग पाडण्यात आले. त्या काळात दिलेल्या कर्जांची परतफेड फार कमी प्रमाणात झाली. ही कर्जे काही निवडक लोकांनाच देण्यात आली. या लोकांची परतफेड करण्याची क्षमता आहे काय, याचा विचार करण्यात आला नाही. परिणामी, बँक क्षेत्राची मोठी हानी झाली. आयडीबीआय बँकेची घसरणही काँग्रेसच्याच चुकीच्या धोरणांमुळे झाली आहे. आमचे सरकार आले त्यापूर्वीच ही बँक डबघाईला आली होती. आम्ही ती सावरण्याचा प्रयत्न गेली 12 वर्षे केला. त्यामुळे तिची परिस्थिती काहीसी सुधारली. आता या बँकेत निर्गुंतवणूक करणे क्रमप्राप्त आहे. म्हणून तसा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी या संदर्भात पूर्ण माहिती घेतल्याशिवाय ना बोलल्यास बरे होईल, अशा अर्थाचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.