कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मारहाणीनंतर सीतारामचे फोटो पोलिसांच्या हाती

12:58 PM Sep 24, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

तालुक्यातील वाटद खंडाळा खून प्रकरणात मृत सीताराम वीर याला मारहाण झाल्यानंतरचे फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत़ यामध्ये वीर याच्या चेहऱ्यावर व पायावर मारहाण झाल्याचे दिसून येत आह़े दुर्वास व त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण करून सीतारामचा खून केला होत़ा मात्र नातेवाईकांनी परस्पर मृतदेहावर अत्यंसंस्कार केल्याने सीताराम याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नव्हत़ा मात्र आता फोटो प्राप्त झाल्याने पोलिसांना तपासात मोठे यश आल्याचे बोलले जात आह़े

Advertisement

मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खूनाच्या तपासामध्ये संशयित दुर्वास पाटील व त्याच्या दोघा साथीदारांनी कळझोंडी येथील सीताराम वीर व राकेश जंगम यांचा खून केल्याची कबुली पोलिसांजवळ दिली होत़ी 29 एप्रिल 2024 रोजी सीताराम याच्या खूनाची घटना घडली होत़ी सुमारे दीड वर्षानंतर सीताराम याचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने पोलिसांपुढे पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होत़े दरम्यान, मारहाणीनंतर घरी आणलेल्या सीताराम याचे एका व्यक्तीने फोटो काढून ठेवले होत़े हे फोटो आता पोलिसांच्या हाती आल्यामुळे सीताराम याला मारहाण झाल्याचे शाबित करण्यासाठी महत्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आह़े

गुह्यातील माहितीनुसार दुर्वास पाटीलचे भक्ती मयेकर हिच्याशी प्रेमसंबंध आहेत हे सीतारामला समजले होत़े त्याने भक्तीशी ओळख वाढविण्यासाठी तिचा मोबाईल नंबर मिळविल़ा यानंतर सीताराम हा भक्ती हिला सातत्याने फोन करत होत़ा सीताराम हा आपल्याला फोन करून त्रास देतो अशी तक्रार भक्ती हिने प्रियकर दुर्वासकडे केल़ी त्यानुसार सीतारामला अद्दल घडवायची असा इरादा दुर्वास याने केल़ा 29 एप्रिल 2024 रोजी सकाळी सीताराम दुर्वासच्या खंडाळा येथील सायली बारमध्ये दाऊ पिण्यासाठी आला होत़ा यावेळी दुर्वासने विश्वास पवार व राकेश जंगम याच्या मदतीने सीतारामला काठीने, हाताच्या थापटाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल़ी. यात सीतारामचा मृत्यू झाला असल्याचे दुर्वासला समजले होत़े त्याच अवस्थेत सीतारामला दुर्वास रिक्षाने त्याच्या घरी घेवून गेल़ा सीतारामला दाऊ पित असताना अचानक चक्कर आली असून तो बेशुद्ध झाल़ा अशी कथा दुर्वास याने सीतारामच्या नातेवाईकांना सांगितल़ी दुर्वासच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवल़ा तसेच सीतारामच्या उपचारासाठी डॉक्टरला घरी बोलावल़े घरी आलेल्या डॉक्टरने सीताराम मृत झाल्याचे सांगितल़े यावेळी नातेवाईकांनी पोलिसात खबर न देताच सीतारामचा अत्यंविधी उरकून घेतला होता.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article