महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीताराम येच्युरी यांची प्रकृती गंभीर

06:17 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

मार्क्सवादी साम्यवादी पक्षाचे (सीपीएम) ज्येष्ठ नेते सीताराम येच्युरी यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात (आयसीयु) उपचार केले जात आहेत. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असून त्यामुळे कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांच्या पक्षाने दिली आहे.

Advertisement

त्यांच्या फुप्फुसांना विषाणू संसर्ग झाल्याने 19 ऑगस्टला रुग्णालयात नेण्यात आले होते. तेव्हापासून ते भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) दिल्लीतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची स्थिती सध्या नाजूक असल्याचे वक्तव्य त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केले असून त्यांना न्यूमोनिया हा विकार झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही काळापूर्वी त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली.

थोडा काळ सुधारणा

गेले तीन आठवडे ते रुग्णालयातच आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली होती. तथापि, गेल्या काही दिवसांपूर्वीपासून मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांचे वय 72 वर्षांचे असून त्यांनी काही काळापूर्वी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या निधनावर रुग्णालयात उपचार घेत असतानाच प्रतिक्रिया दिली होती. रुग्णालयात त्यांच्यावर सहा मिनिटांचा एक व्हिडीओही करण्यात आला होता. येच्युरी यांनी 2004 मध्ये काँग्रेसप्रणित सरकार केंद्रात स्थापन झाल्यानंतर या सरकारसाठी किमान समान कार्यक्रम तयार केला होता. त्यांना याकामी काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सहकार्य केले होते. ते जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षही राहिलेले आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article