For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजकोट संदर्भात एस.आय.टी नेमून चौकशी समिती गठीत करावी

05:34 PM Aug 27, 2024 IST | अनुजा कुडतरकर
राजकोट संदर्भात एस आय टी नेमून चौकशी समिती गठीत करावी
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

मालवण राजकोट परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. महाराष्ट्राला काळीमा लावणारी ही घटना आहे. सदर घटनेचा मराठा महासंघामार्फत निषेध करण्यात येत आहे. सदरची जागा अपवित्र झाल्यामुळे त्या ठिकाणी दुधाचा अभिषेक करावा. व जागा साफ करावी. स्वतंत्र एस. आय. टी नेमून चौकशी समिती गठीत करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने बैठकीत केली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी दिली.

सदर घटनेनंतर घडलेल्या शासकीय हालचालींवरून शासनाच्या कारभाराबाबत काही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सदरची घटना घडण्यापुर्वी मालवण येथील सहाय्यक अभियंता श्रेणी -1, सार्वजनीक बांधकाम विभाग यांनी त्यांचे कार्यालयातील पत्र .20/08/2024 च्य पत्राने कमांडर, अभिषेक कारभारी, एरीया कोस्टल सिक्युरीटी ऑफीसर, यांना पत्र लिहून छत्रपती शिवरांच्या पुतळ्याबाबतच्या वस्तुस्थितीची जाणीव करून दिलेली दिसून येते. त्यात त्यांनी सदरचा पुतळ्याची डागडुजी जुन महिन्यात करण्यात आल्याचे नमूद केलेले आहे. डागडूजी करून सुध्दा सदरचा पुतळा विद्रुप दिसत आहे, पुतळयाचे नट बोल्ड निघाल्याचे नमूद केले आहे. सदर सार्वजनीक बांधकाम अधीकारी यांनी त्यांना सदरच्या पुतळयाचे स्थापत्य बाबत जर शंका होती तर त्यांनी त्यांचे स्तरावर सदर पुतळ्याच्या संरक्षणतेबाबत तात्पुरती उपाययोजना का केली नाही. जुन महिन्यात पुतळयाची कोणती डागडूजी करण्यात आली याचा तपशील जनतेला समजणे गरजेचे आहे.

Advertisement

पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर तातडीने जनतेची दिशाभुल करण्यासाठी सहाय्यक अभियंता श्रेणी1 सार्वजनीक बांधकाम विभाग, मालवण चे अधीकारी श्री. अजित पाटील यांनी पुतळा उभारणारे जयदीप पाटील व ठेकेदार चेतन पाटील यांचे विरूध्द मालवण पोलीस ठाण्यात भारतीय न्यास संहिता कलम 109,110,125,318,3 (५), सार्वजनीक मालमत्ता नुकसान कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला. सदर गुन्हाची परीभाषा पाहता असे दिसून येते की, पुतळा बांधणी व उभारण्याचे वेळी योग्य ती काळजी घेतलेली नाही, अशी काळजी न घेतल्याने कोणाचाही मृत्यु होऊ शकतो याची जाणीव पुतळा उभारणाऱ्याना होती व आहे. अशी जर परीस्थिती होती तर पुतळयाची जुन महिन्यात डागडुजीला सार्वजनीक बांधकामा अधीकारी यांची डागडूजीला परवानीगी कोणत्या कारणाने व अधीकारामध्ये देण्यात आली. यावरून सदरचा पुतळा हा कोणत्याही तांत्रिक कारणामुळे कोसळला नसल्याचे स्पष्ट होत आहे. सदरचा पुतळा कोसळण्यामागे शासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे.

मराठा महासंघाची मागणी अशी आहे की, पुतळा उभारण्याच्या बाबतची सर्व कागदपत्रे सार्वजनिक करावीत, त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग पोलीसांनी सदर चौकशी कामी धातुशास्त्र तज्ञ व तज्ञ शिल्पकार यांची तपासकामी मदत घ्यावी. त्याचप्रामणे मराठा महासंघ मा. नरेद्र मोदी पंतप्रधान यांना जनतेची पत्र पाठवून सदरची बाब लक्षात आणून देण्यात येणार आहे व दि.30/08/2024 रोजी शासनाच्या भ्रष्ट अधिकारी यांचा स्पर्श झाल्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या ठिकाणी पुतळा उभारला होता ती जागा अपवित्र झाली आहे म्हणून सदर जागेवर दुधाचा अभिषेक करून साफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शासनाने सदर कामी चौकशी करण्याकरीता स्वतंत्र एस आय टी नेमून त्यात जे.जे स्कूल ऑफ आर्ट कॉलेज मधील शिल्पकलेतील तज्ञ व्यक्ती तसेच आयआयटी मुंबई मधील धातू शास्त्र तज्ञांचा मार्गदर्शनाखाली समिती गठीत करण्यात यावी आणि ही समिती गठित न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल व आंदोलन छेडण्यात येईल असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड . सुहास सावंत यांनी स्पष्ट केले

Advertisement
Tags :

.