कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मतचोरीसंबंधी एसआयटीकडून स्फोटक माहिती उघड

10:19 AM Oct 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर : 2023 च्या विधानसभा निवडणुकीत आळंद मतदारसंघात झालेल्या कथित मतचोरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीने मते वगळण्याचे प्रयत्न झाल्याचे शोधून काढले आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सहा संशयितांची ओळख पटवली आहे. यशस्वीरित्या वगळलेल्या प्रत्येक मतासाठी संशयितांना 80 रुपये देण्यात आले होते, असे गुन्हे अन्वेषण विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. 6,994 मते वगळण्यासाठी विनंत्या आल्या होत्या. आळंद मतदारसंघ कलबुर्गी जिल्ह्यातील असून हा काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार बी. आर. पाटील यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. ही बाब बी. आर. पाटील आणि मंत्री आमदार प्रियांक खर्गे यांनी कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article