महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरइतरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एच. डी. रेवण्णा यांची पुन्हा कोंडी?

10:05 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जामीन रद्द करण्यासाठी एसआयटी उच्च न्यायालयात

Advertisement

बेंगळूर : म्हैसूरमधील महिलेल्या अपहरण प्रकरणात निजदचे आमदार आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, हा जामीन रद्द करावा, अशी याचिका एसआयटीने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे रेवण्णांची पुन्हा कोंडी होण्याची शक्यता आहे. पीडित महिलेच्या अपहरण प्रकरणात तसेच लैंगिक शोषण प्रकरणांमध्ये एच. डी. रेवण्णा यांना जामीन मिळाला आहे. यापैकी सर्वप्रथम महिलेच्या अपहरण प्रकरणात त्यांना जामीन मिळाला. हा जामीन रद्द करण्याची विनंती एसआयटीने उच्च न्यायालयाला केली आहे. या याचिकेवर 31 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

प्रज्ज्वलचा ठावठिकाणा शोधण्यासाठी प्रयत्न

अश्लील चित्रफिती आणि लैंगिक शोषण प्रकरणी 31 मे रोजी एसआयटीसमोर हजर होणार असल्याचे खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांनी व्हिडिओद्वारे सांगितले आहे. त्यांनी कोणत्या देशातून व्हिडिओ जारी केला आहे, यासंबंधी एसआयटीने तपास सुरू केला आहे. राज्यातील लोकांची माफी मागत प्रज्ज्वल रेवण्णा यांनी सोमवारी एक व्हिडिओ शेअर केला होता. आपल्यावरील आरोपांसंबंधी एसआयटीसमोर हजर होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ कोठून आणि कोणत्या देशात शेअर केला याचा तपास एसआयटीचे अधिकारी करत आहेत. प्रज्ज्वल यांनी मागच्या वेळीही एसआयटीसमोर हजर होण्यास आठवडाभराचा अवधी मागितला होता. मात्र, आठवडा उलटूनही ते देशात परतले नाहीत. त्यामुळे आता एसआयटीचे अधिकारी प्रज्ज्वल रेवण्णा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. प्रज्ज्वल परतत असल्याने केंद्रीय तपास यंत्रणांनाही याबाबत माहिती दिली आहे. ते परदेशातून थेट बेंगळूरला येतील की अन्य विमानतळावर, याबाबत एसआयटी अलर्ट आहे. भारतात परतल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी एसआयटी तयारीत आहे.

तीन ठिकाणी एसआयटीची छापेमारी

खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अश्लील चित्रफीत प्रकरणी मंगळवारी एसआयटीने पुन्हा तीन ठिकाणी छापे टाकले. सर्च वॉरंटसह आलेल्या एसआयटीच्या पथकांनी हासन जिल्ह्यात माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांचे निवासस्थान, हासनमधील खासदारांचे निवासस्थान, चन्नरायपट्टण येथील फार्महाऊसवर छापा टाकून झडती घेतली. पोलीस निरीक्षक राव गणेश, शोभा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली आहे.

पेनड्राईव्ह प्रकरणी नवीनगौडा, चेतन एसआयटीच्या ताब्यात

खासदार प्रज्ज्वल रेवण्णा यांचे अश्लील व्हिडिओ असणारे पेनड्राईव्ह उघड केल्याप्रकरणी मंगळवारी एसआयटीने नवीनगौडा आणि चेतन यांना ताब्यात घेतले आहे. पेनड्राईव्ह उघड केल्याप्रकरणी एसआयटीने नवीनगौडा आणि चेतन या दोघांविरुद्ध समन्स जारी केले होते. मात्र, ते चौकशीला हजर न झाल्याने त्यांच्या अटकेसाठी एसआयटीने शोधाशोध सुरू केली. याच दरम्यान, दोघांनी अटकपूर्व जामिनासाठी मागील आठवड्यात याचिका दाखल केली होती. मंगळवारी सुनावणीसाठी ते न्यायालयात हजर झाले. सुनावणी झाल्यानंतर एसआयटीने उभयतांना ताब्यात घेतले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article