भावाच्या मृत्यूची बातमी ऐकताच बहिणीचाही मृत्यू
बहिण -भावाचे अनोखे बंधन पाहून समस्त कोगेगाव हळहळतेय.
कसबा बीड / वार्ताहर.
कोगे तालुका करवीर येथील सर्जेराव शंकर पाटील वय 68 यांचे आकस्मित निधन झाले. सर्व सामान्य कुटुंबातील सर्जेराव पाटील यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. दोन मुलींची लग्ने केली. हा संसाराचा गाडा ओढत असताना त्यांच्या जीवनामध्ये अनेक चढउतार आले. पण त्यांनी न डगमगता आपल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण केल्या व मुलाला इंजिनिअर बनवले .त्यांचा मुलगा रणजीत पाटील हा एचडीएफसी बँकेमध्ये उच्च पदावर काम करत आहे .पण नीतीचा खेळ कोणाला चुकलेला नाही. संपूर्ण कसे मनासारखे झाल्यामुळे सर्जेराव पाटील हे सर्वांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होत असायचे. पण आज सकाळी पहाटे चार वाजता त्याचे आकस्मित निधन झाले. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व पाहुण्यांना समजली. बाहेर गावचे पाहुणे येत होते. पण त्यांची चुलत बहिणी सौ कमल बाळासो साठे वय 55 या कोगे गावात राहत होत्या . ही बातमी समजल्यावर त्यांना अवस्थ झाल्यासारखे वादू लागले . म्हणून नातेवाईकांनी उपचारासाठी जात असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. भावाचा मृत्यू झाला ही बातमी त्यांना सहन झाली नाही. त्यांच्या बहिण भावाच्या मृत्यूने संपूर्ण कोगे गाव हळहळतेय. सर्जेराव पाटील यांच्या पश्चात, दोन मुली व एक मुलगा तर सौ कमल साठे यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या बहिण भावाची रक्षाविसर्जन बुधवारी आहे.