For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिसोदियांना आजचा दिवस पत्नीला भेटण्याची अनुमती

06:04 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
सिसोदियांना आजचा दिवस पत्नीला भेटण्याची अनुमती
Advertisement

दिवाळी तुरुंगातच : पाच दिवसांची मागणी फेटाळली

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मद्य धोरण प्रकरणात तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदिया यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केवळ एक दिवस आजारी पत्नीला भेटण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आज म्हणजेच 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सिसोदिया पत्नीची भेट घेऊ शकतील. मात्र, उर्वरित दिवसांसाठी दिलासा न मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे.

Advertisement

सिसोदिया यांनी 9 नोव्हेंबर रोजी न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी पाच दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र, न्यायालयाने त्यांना केवळ एका दिवसाचीच अनुमती दिली. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना या कालावधीत प्रसारमाध्यम प्रतिनिधी किंवा इतर कोणत्याही राजकारण्याला भेटता येणार नाही किंवा कोणतेही वक्तव्य करता येणार नाही. यापूर्वी, जून 2023 मध्ये सिसोदिया यांनी 103 दिवसांनी आपली पत्नी सीमा सिसोदिया यांची भेट घेतली होती.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तुरुंगातच दिवाळी साजरी करणार आहेत. राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना त्यांच्या आजारी पत्नीला 5 दिवस भेटण्याची परवानगी दिली नाही. खटल्याच्या सुनावणीदरम्यान मनीष सिसोदिया यांच्या वकिलाने पत्नीच्या भेटीसाठी अधिकाधिक वेळ वाढवून मिळण्यासाठी आग्रह धरला. पाच दिवस शक्य नसेल तर किमान दोन दिवस तरी पत्नीला भेटण्याची अनुमती मिळावी, असे त्यांनी सांगितले. तसेच उच्च न्यायालयाने यापूर्वीही त्यांच्या पत्नीला अशा प्रकारे भेटण्याची परवानगी दिली होती. त्याचवेळी सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या अर्जाला विरोध करत मनीष सिसोदिया यांनी अंतरिम जामिनासाठी यावे, असे सांगितले. मात्र, दोन्ही तपास यंत्रणांनी वैद्यकीय प्रमाणपत्रांची तपासणी केली आहे का? अशी विचारणा न्यायालयाने केल्यावर अद्याप कागदपत्रांची तपासणी केलेली नाही, असे सीबीआय आणि ईडीने न्यायालयाला सांगितले. त्याचवेळी मनीष सिसोदिया यांच्या वकिलाने यातील अनेक वैद्यकीय प्रमाणपत्रे उच्च न्यायालयात सादर करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर राऊस एव्हेन्यू न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना आजारी पत्नीला भेटण्याची परवानगी दिली. त्यानुसार आज, शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पत्नीला भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

Advertisement
Tags :

.