For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

9 राज्यांमध्ये ‘एसआयआर’ प्रक्रिया सुरू

06:42 AM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
9 राज्यांमध्ये ‘एसआयआर’ प्रक्रिया सुरू
Advertisement

बीएलओंकडून घरोघरी अर्ज पोच होणार: राजकीय वाक्युद्ध तीव्र : तृणमूलकडून विरोधात मोर्चा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निवडणूक आयोगाने मंगळवारपासून 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्पेशल इंटेंसिव रिव्हिजनचा (एसआयआर) दुसरा टप्पा सुरू केला आहे. या अभियानात तामिळनाडू, केरळ, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, गुजरात, पु•gचेरी, अंदमान आणि निकोबार बेटसमह आणि लक्षद्वीपचे जवळपास 51 कोटी मतदार सामील होतील. यातील तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि पु•gचेरीत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे.

Advertisement

एसआयआर 2.0 अंतर्गत एन्यूमरेजनचा टप्पा मंगळवारपासून सुरू होत 4 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. निवडणूक आयोग 9 डिसेंबर रोजी मसुदा मतदार यादी जारी करणार आहे. तर अंतिम मतदारयादी 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रकाशित केली जाणार आहे. 9 डिसेंबर ते 8 जानेवारीपर्यंत लोकांना दावे आणि आक्षेप  नोंदविता येणार आहेत. ज्यानंतर सुनावणी तसेच पडताळणी 31 जानेवारीपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.

विविध राज्यांमध्ये प्रक्रिया सुरू

उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत पडताळणी प्रक्रिया सुरू झाली आहे. आयोगाने मतदारयादीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने उत्तरप्रदेशातही एसआयआर प्रक्रिया हाती घेतली आहे. पश्चिम बंगालमध्येही बूथ लेव्हर ऑफिसर्स घरोघरी जात अर्ज वितरित करून लोकांना प्रक्रिया आणि अर्ज भरण्याची पद्धत समजावत आहेत.

राजकारण तीव्र

एसआयआरवरून राजकीय वाक्युद्ध आणि विरोधही सुरू झाला आहे. अवैध घुसखोरांना मतदारयादीत सामील करत बंगालच्या लोकसंख्येचे स्वरुप बदलले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. ममता बॅनर्जी रोहिंग्यांना बंगालमध्ये बोलावून मतदारयादीत स्थान देत असल्याचा दावाही भाजपने केला. तर आसाममध्ये एसआयआर देखील एकप्रकारचा एनआरसी ठरणार असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. एसआयआर प्रक्रियेच्या विरोधात तामिळनाडूतील सत्तारुढ पक्ष द्रमुकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. द्रमुकच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

एसआयआर विरोधात ममतांचा मोर्चा

एसआयआरवरून बंगालचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यातील सत्तारुढ पक्ष तृणमूल याला विरोध करत आहे, तर भाजपने प्रक्रियेचे स्वागत केले आहे. भाजप बंगाली स्थलांतरितांना बांगलादेशी ठरवून बंगालच्या विरोधात अफवा पसरवित असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. एसआयआरद्वारे बंगालच्या मतदारांना भयभीत करण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप मतांच्या जोरावर नव्हे तर नोटांच्या बळावर निवडणूक जिंकू पाहत आहे.

Advertisement
Tags :

.