For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिनर-व्हेरेव्ह जेतेपदासाठी लढत

06:32 AM May 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिनर व्हेरेव्ह जेतेपदासाठी लढत
Advertisement

वृत्तसंस्था, माद्रिद (स्पेन)

Advertisement

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रिद खुल्या एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत इटलीचा टॉपसिडेड जेनिक सिनर आणि जर्मनीचा अॅलेक्सझांडेर व्हेरेव्ह यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.

या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात टॉपसिडेड जेनिक सिनरने आर्थर फिल्सचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. सिनरला आता सलग पाचव्यांदा मास्टर्स स्पर्धेतील जेतेपद मिळविण्यासाठी केवळ एका विजयाची जरुरी आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेव्हने अॅलेक्सझांडेर ब्लॉक्सचा 6-2, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. एटीपी टूरवरील सर्व म्हणजे 9 मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळविणारा जेनिक सिनर हा चौथा टेनिसपटू आहे. यापूर्वी स्विसचा रॉजर फेडरर, सर्बियाचा जोकोविच आणि स्पेनचा नदाल यांनी हा पराक्रम केला होता. 24 वर्षीय सिनरचा हा एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धेतील हा 27 वा विजय आहे. त्याने गेल्या वर्षी पॅरिसमध्ये फ्रेंच ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. तसेच 2026 च्या टेनिस हंगामात त्याने इंडियन वेल्स, मियामी आणि मॉन्टेकार्लो टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.