द रॉयल्समध्ये सिनी शेट्टी
ईशान खट्टर अन् गुरफतेह देखील मुख्य भूमिकेत
पहिल्या सीझनला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यावर आता ‘द रॉयल्स’च्या दुसऱ्या सीझनवरून प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. यावेळी सीरिजच्या कहाणीसोबत कलाकारांमध्येही मोठा बदल दिसून येऊ शकतो. सीरिजमध्ये ईशानखट्टर पुन्हा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. तर मिस इंडिया 2022 ची विजेती सिनी शेट्टीची सीरिजमध्ये एंट्री झाली आहे. सिनी या सीझनमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारू शकते. तर पहिल्या सीझनमध्ये ईशानसोबत दिसून आलेल्या भूमी पेडणेकरची ती जागा घेणार आहे.
द रॉयल्स सीझन 2 मध्ये ईशान, सिनी आणि गुरफतेह पीरजादा यांच्यात लव्ह ट्रायंगल दाखविण्यात येणार आहे. सीरिजचे चित्रिकरण उदयपूरमध्ये पार पडणार आहे. सिनी शेट्टीकरता ही मोठी संधी ठरणार आहे. सिनी शेट्टीपूर्वी या भूमिकेसाठी राधिका मदान, अलाया एफ आणि नितांशी गोयल समवेत अनेक अभिनेत्रींच्या नावांचा विचार करण्यात आला होता. सिनीने यंदा धर्मा प्रॉडक्शन्सच्या एका चित्रपटाचे चित्रिकरणही पूर्ण पेले आहे.