For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

१० वर्षांपासून सिंगल : अँजेलिना

06:43 AM Jul 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
१० वर्षांपासून सिंगल   अँजेलिना
Advertisement

‘कौचर“च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याचदरम्यान तिने स्वत:च्या डेटिंग लाइफविषयी वक्तव्यं केली आहेत. ब्रॅड पिटपासून विभक्त झाल्यावर मी कुठल्याही नात्यात राहिलेले नाही असे तिने म्हटले आहे.

Advertisement

माझ्या आयुष्यात रोमान्स आता मागे पडला आहे, कारण मी स्वत:ला 6 अपत्यांच्या पालनपोषणात बुडवून घेतले आहे. एक दशकापूर्वी घटस्फोटानंतर मी कुणालाच डेट केलेले नाही. मला पुन्हा जगायचे आहे, पुन्हा स्वतंत्र व्हायचे आहे, एकीकडे जीवनाने मला काही प्रमाणात तोडल्याचे अँजेलिनाने सांगितले आहे.

आत माझ्या मुली मोठ्या झाल्या आहेत, त्या एका युवा महिलेप्रमाणे माझ्याशी बोलत आहेत. त्यांच्याकडे पाहून मी काय गमावले याचे स्मरण होत असल्याचे अँजेलिनाने म्हटले आहे. अँजेलिनाला पूर्वाश्रमीचा पती ब्रॅड पिटपासून 6 अपत्यं आहेत. मॅडॉक्स (24 वर्षे), पॅक्स (22 वर्षे) आणि नॉक्स (17) हे पुत्र आहेत, तर जहारा (21 वर्षे), शिलोह (20 वर्षे) आणि विविएन अशा मुली आहेत. घटस्फोटानंतर एकाकी असल्याचे अँजेलिनो मानले आहे. तर ब्रॅड सध्या इनेस डी रेमनला डेट करत आहे. तसेच लवकरच ब्रॅड तिच्यासोबत विवाहबद्ध होऊ शकतो.

Advertisement

Advertisement
Tags :

.