For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गायिका लेडी गागाने दिला अपत्याला जन्म

06:23 AM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
गायिका लेडी गागाने दिला अपत्याला जन्म
Advertisement

हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका लेडी गागा पहिल्यांदाच आई झाली आहे. लेडी गागा  आणि तिचा जोडीदार मायकल पोलान्स्की यांनी अपत्याचे स्वागत केले आहे. 40 वर्षीय लेडी गागा ही मायकल तसेच नवजातासोबत दिसून आली आहे. लेडी गागा अद्याप विवाहबद्ध झालेले नाही, तिने उद्योजक मायकलसोबत 2024 साली एंगेजमेंट केली होती.

Advertisement

लेडी गागा आणि मायकल हे कॅलिफोर्नियात स्वत:च्या अपत्यासोबत हिंडताना दिसून आले आहेत. एप्रिलमध्ये स्वत:चा ‘मेहम बॉल“ टूर संपुष्टात आल्यापासून लेडी गागा काही महिन्यांपासून प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिली होती. मार्च 2024 मध्ये एका मुलाखतीत लेडी गागाने मातृत्वाच्या अनुभवासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते.

‘बॉर्न थिस वे“ची गायिका लेडी गागाने एप्रिल 2024मध्ये एंगेजमेंट केली होती. रॉक क्लायम्बिंग ट्रिपवर असताना मायकलने माझ्यासाठी एक प्रेमळ सरप्राइज ठेवले होते. आम्ही पर्वतावर चढल्यावर त्याने मला प्रपोज केले होते असे लेडी गागाने सांगितले होते.  पोलान्स्कीने लेडी गागाच्या ग्रॅमी विजेता रिकॉर्ड ‘मेहम“मध्ये लेखक म्हणून योगदान दिले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.