भारतातून पोलीस अधिकाऱ्यांची भरती करणार सिंगापूर
कायदामंत्री शनमुगम यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारत, चीन, फिलिपाईन्स आणि म्यानमारमधून पोलीस अधिकाऱ्यांची भरती करण्याचा विचार सिंगापूर सरकार करत आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये सहाय्यक पोलीस अधिकारी (एपीओ) पदासाठी तैवानमधून येणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे, यामुळे हा विचार केला जात असल्याची माहिती सिंगापूरचे कायदा तसेच गृहमंत्री के. शनमुगम यांनी दिली आहे.
वर्तमान स्थिती पाहता गृह मंत्रालय एपीओ भरतीच्या स्वत:च्या क्षेत्राला तैवान व्यतिरिक्त विस्तार देण्याची इच्छा बाळगून आहे. यात संभाव्य स्वरुपात भारत, चीन इत्यादी देशांमधून लोकांना सामील केले जाईल. सहाय्यक पोलीस दलाला सुरक्षा सेवेत वाढत्या मागणीवरून विदेशातून एपीओंच्या भरतीला मंजुरी देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक कार्यबलात घट, शारीरिक तंदुरुस्ती यासारख्या आवश्यकता पाहता सहाय्यक पोलीस दलांना एपीओंची पुरेशी संख्या कायम राखण्यात आव्हानांना सामोरे जावे लागत आहे असे शनमुगम यांनी सांगितले आहे. तैवानमधून एपीओ भरती करण्याची प्रक्रिया 2017 पासून राबविली जात आहे.