For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांची आचरे संस्थानच्या रामेश्वर मंदिरास भेट

11:43 AM Sep 07, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांची आचरे संस्थानच्या रामेश्वर मंदिरास भेट
Advertisement

39 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची घेतली माहिती

Advertisement

आचरा | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरास भेट देत श्रीदेव रामेश्वर व मंदिरातील विराजमान गणरायाचे दर्शन घेतले. 39 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची माहिती यावेळी घेतली. श्री गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन सिंधुदुर्गवासीयांच्या सुख-समृद्धी व आरोग्यपूर्ण जीवनासाठी प्रार्थना केली. गणरायाच्या चरणी त्यांनी शांतता, ऐक्य आणि कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत राहावी, अशी मनोकामना व्यक्त केली.भेटीदरम्यान ते म्हणाले की गणेशोत्सव हा कोकणच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा होतोय. सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सुरक्षेची व्यापक तयारी करते नागरिकांनी उत्सव आनंदात, परस्परांमध्ये सौहार्द जपत आणि प्रशासनाला सहकार्य करून साजरा करावा असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी केले. या भेटीच्यावेळी रामेश्वर संस्थानंच्या वतीने देवस्थान ट्रस्टचे सचिव संतोष मिराशी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी खजिनदार कपिल गुरव, विश्वस्त संजय मिराशी, कारकून शंकर देसाई, आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार तसेच स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.