कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिंधुदुर्ग शिवसेनेचा 5 एप्रिलला पावशी येथे मेळावा

12:10 PM Apr 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

संपर्कमंत्री उदय सामंत, आ. निलेश राणे, आ. दीपक केसरकर, उपनेते संजय आंग्रे यांची प्रमुख उपस्थिती

Advertisement

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा मेळावा शनिवार 5 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता कुडाळ पावशी येथील वाटवे कार्यालय येथे संपर्कमंत्री तथा राज्याचे उद्योमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, राजू बिडये, मंदार लुडबे, बाबू धुरी, सुरज बिरमोळे आदी उपस्थित होते. दत्ता सामंत म्हणाले सिंधुदुर्ग जिल्हासंपर्क मंत्री उदय सामंत यांचा स्वागत सत्कार सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने केला जाणार आहे. पक्ष संघटनात्मक दृष्टीने आयोजित या मेळाव्यात प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी शिवसेना आजी, माजी पदाधिकारी, शाखा प्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, सहकारातील प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन दत्ता सामंत यांनी केले आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्गात

शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने जे यश प्राप्त झाले. त्याबाबत जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी आभार मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिली.

फोटो : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कुंभारमाठ येथील निवासस्थानी पत्रकारांना माहिती दिली. (अमित खोत, मालवण)

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article