For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्ग नाभिक समाजाचे नेते भाई आकेरकर यांचे निधन

04:26 PM Jan 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्ग नाभिक समाजाचे नेते भाई आकेरकर यांचे निधन
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

Advertisement

​सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेला १९८८ नंतर खऱ्या अर्थाने समाज प्रगतीची नवी दिशा देणारे, समाजाचे ऋषीतुल्य मार्गदर्शक आणि सावंतवाडीचे ज्येष्ठ रहिवासी अनंत नारायण आकेरकर (८५) यांचे सोमवार २६ जानेवारीला रात्री नऊ वाजता राहत्या घरी निधन झाले. 'भाई' या नावानेच ते ओळखले जात . भाईंचे शिक्षण त्या काळी उर्दू माध्यमातून झाले होते. भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व आणि प्रगल्भ विचारांमुळे त्यांनी समाजाला नेहमीच वैचारिक दिशा दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक बांधवांना एकत्र करून त्यांच्या अडचणी सोडवण्यात भाईंचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या शब्दाला समाजात मोठा मान होता.आपल्या मृदू स्वभावाने आणि मार्गदर्शक वृत्तीने त्यांनी सर्वच समाजातील लोकांशी आपुलकीचे नाते जोडले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे,सुना, भाऊ ,बहिणी,नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.