महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिंधुदुर्ग जिल्हा क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज अध्यक्षपदी सूर्यकांत घाडी

04:43 PM Aug 18, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

उपाध्यक्षपदी मधुकर घाडी तर सचिवपदी प्रदीप घाडी यांची निवड

Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी

Advertisement

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी सूर्यकांत म. घाडी (किंजवडे), उपाध्यक्षपदी मधुकर ता. घाडी (आकेरी ), तर सचिवपदी प्रदीप रा. घाडी (दहिबाव ) यांची निवड करण्यात आली. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाच्या रविवारी झालेल्या वार्षिक बैठकीत ही निवड करण्यात आली.क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज सिंधुदुर्ग जिल्हा नवीन कार्यकारीणीची निवडणूक प्रक्रिया निवडणूक निरीक्षक सूर्यकांत म. घाडी (किंजवडे ) व मुंबई मध्यवर्ती सदस्य तथा पत्रकार विजय गांवकर (दिगवळे ) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी २०२४-२५ ते २०२६-२७ या तीन वर्षासाठी निवडण्यात आली.क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाजाची उर्वरित जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे सहसचिव बुधाजी का. घाडीगांवकर (सोनवडे ), खजिनदार सुनील वा. गांवकर (सोनवडे ), सदस्य विलास गांवकर (कसवण ), विजय घाडी (भरणी ), अर्जुन बापर्डेकर (आचरा ), सदानंद घाडीगांवकर (हरकुळ बु.), सत्यवान घाडीगांवकर (सोनवडे ), उमेश घाडी (शिरगांव ), कैलास घाडीगांवकर (शिरवंडे ), उमेश घाडीगांवकर ( युवा -राखीव -वागदे ), भिसाजी घाडी (जेष्ठ राखीव -वरवडे ), सौ. प्रीतम घाडीगांवकर (महीला राखीव - कळसुली )
तसेच मुंबई मध्यवर्ती कार्यकारी मंडळावर उर्वरित तीन सदस्यांमध्ये सहकार /कला व सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणारे सदस्य म्हणून पत्रकार विजय सा. गांवकर तर मुंबई मध्यवर्ती कार्यकारीणी पदासाठी लक्ष्मण सं. घाडीगांवकर (वागदे ) यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी मुंबई मध्यवर्ती कार्यकारी मंडळावर दोन पदसिद्ध सदस्य म्हणून प्रदीप रा. घाडी आणि विलास शं. गांवकर यांची निवड करण्यात आली. तसेच सिंधुदुर्ग विभागाचे अंतर्गत हिशेब तपासनीस म्हणून माजी सैनिक दत्तगुरू गांवकर (कुपवडे ) यांची निवड करण्यात आली. तर सिंधुदुर्ग विभागाचे सल्लागार म्हणून आत्माराम सु. घाडीगांवकर (कळसुलकर गुरुजी ) यांची निवड करण्यात आली.

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # news update #
Next Article