For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक नोकर भरतीतील उमेदवारांची परीक्षा २८ फेब्रुवारीला

04:39 PM Feb 20, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्ग जिल्हा बँक नोकर भरतीतील उमेदवारांची परीक्षा २८ फेब्रुवारीला
Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबवली जात आहे. परिक्षा जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे घेतली गेली नव्हती. परीक्षेची तारीख आय.बी.पी.एस कंपनीकडून दि.२८ फेब्रुवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आलेली आहे. जिल्हा बँकेने आय.बी.पी.एस मार्फत भरती प्रक्रिया जाहीर करताना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी,मडगाव व म्हापसा अशी पाच ठिकाणी जाहीर केली होती. परंतु लिपिक पदाच्या या भरतीसाठी जिल्हाभरातून ५०७७ अर्ज प्राप्त झाल्याने पूर्वी जाहीर केलेल्या पहिल्या पाच ठिकाणांमध्ये सर्व अर्जदार उमेदवारांची संख्या सामाविष्ट होणे शक्य नसल्याने तसेच आवश्यक त्या प्रमाणात परीक्षा केंद्रांची उपलब्धता नसल्याने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नव्याने आणखी पाच परिक्षा ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता ही परिक्षा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा सांगली, पुणे, मुंबई ,म्हापसा ,मडगांव, पणजी अशा दहा ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे हॉल तिकीट बाबतचा मॅसेज परिक्षा फॉर्म भरताना नमूद केलेल्या ई-मेल ऍड्रेस वर व फॉर्म फॉर्म मधील नमूद मोबाईल नंबरवर आय.बी.पी.एस कंपनीकडून पाठवण्यात येणार आहे. परिक्षार्थींचे हॉल तिकीट बँकेच्या www.sindhudurgdcc.bank.in या संकेतस्थळावर आयबीपीएस च्या लिंकवरून दिनांक २३/०२/२०२६पासून उपलब्ध होणार आहे. सदर लिंकवरून हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावयाचे आहे.हॉल तिकीट डाउनलोड केल्यानंतर त्यावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून आवश्यक मूळ कागदपत्रांसह रिपोर्टिंग टाइमिंगच्या पंधरा मिनिटे आधी संबधीत परिक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. तरी उमेदवारांनी आपला इमेल दररोज तपासावा व बँकेच्या संकेतस्थळावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे. सर्व पात्र परिक्षार्थी यांनी वेळेवर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षेस सहभागी व्हावे व उज्वल यश संपादन करावे असे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.