कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या

05:33 PM Nov 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

देवगड / प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुणगे शाखा व्यवस्थापक अविनाश काशिराम तळवडेकर (५१, मूळ रा. आरे बौद्धवाडी, सध्या रा. मुणगे) यांनी आरे जेठेवाडी येथील कौल कारखान्यानजीक असलेल्या तळ्यात आत्महत्या केली. ही घटना २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकलेले नाही. या घटनेने देवगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ आरे बौद्धवाडी येथील अविनाश तळवडेकर हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुणगे शाखेत व्यवस्थापक म्हणून गेली दीड वर्षे कार्यरत होते. कामानिमित्त ते मुणगे येथेच पत्नीसमवेत भाड्याने वास्तव्यास होते. २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास घरी आलेल्या अविनाश तळवडेकर हे पत्नी सुनीता हिला 'बँकेत जाऊन येतो', असे सांगून घरातून निघून गेले. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते न सापडल्याने त्यांची पत्नी सुनीता यांनी २६ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.२० वा. च्या सुमारास देवगड पोलीस स्थानकात बेपत्ता फिर्याद दाखल केली. दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. च्या सुमारास आरे जेठेवाडी येथील कौल कारखान्यानजीक अविनाश तळवडेकर यांची दुचाकी व मोबाईल आढळून आला. तसेच तेथील तळ्यात त्यांचा मृतदेह तरंगताना स्थानिक ग्रामस्थांना आढळून आला. या घटनेची फिर्याद आरे पोलीस पाटील राजेंद्र बाबाजी कदम (रा. आरेश्वरवाडी) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली. देवगडचे पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव, पोलीस हवालदार आशिष कदम, महेंद्र महाडिक यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. घटनेचा तपास पोलीस हवालदार महेंद्र महाडिक करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun Bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news # suicide #
Next Article