For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गातील शेतजमिनींच्या खरेदी-विक्रीची चौकशी करा; मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

01:15 PM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
सिंधुदुर्गातील शेतजमिनींच्या खरेदी विक्रीची चौकशी करा  मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Advertisement

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकरी नसलेल्या व्यक्तींसह जिल्ह्याबाहेरील तसेच परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणावर शेतजमिनींची खरेदी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या जमीन व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. काही व्यवहारांमध्ये शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र अथवा इतर महसूल कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त करत मागील पाच ते दहा वर्षांतील संशयास्पद व्यवहारांची तालुकानिहाय तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, तालुकाध्यक्ष गॅरी अननसिएशन, तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, मनविसे उपविभाग अध्यक्ष अभिजीत मेथर, प्रथमेश धुरी, तालुका सचिव सूरज पुजारे, प्रसाद परब, प्रितेश सावंत आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे यांची भेट घेत निवेदन सादर केले.

सिंधुदुर्गची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेती, बागायती आणि ग्रामीण व्यवसायांवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतजमिनींचे नियमबाह्य हस्तांतरण होत असल्यास प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यवहारांची पडताळणी करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.

Advertisement

संशयास्पद जमीन व्यवहारांची तपासणी करण्यासाठी विशेष महसूल पथक स्थापन करावे, तसेच शेतकरी प्रमाणपत्रांचा वापर करून झालेल्या व्यवहारांची कागदपत्रांच्या आधारे छाननी करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.