कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिंपल एनर्जीची वन एस इलेक्ट्रीक स्कूटर लाँच

07:00 AM Mar 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

181 किमीचे देणार मायलेज : 1 लाख 39 हजार ऊपये किंमत

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

सिंपल एनर्जी या कंपनीने आपली सिंपल वन एस ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच केली आहे. 1 लाख 39 हजार एक्स शोरुम किंमत गाडीची असणार असून 181 किलोमीटर इतके मायलेज ही गाडी देणार आहे. 105 किलो मीटर प्रती तास इतका वेग ही गाडी घेणार असून 8.5 के डब्ल्यू पीएमएसएम मोटर आणि  3.7 केडब्ल्यूएचची बॅटरी देण्यात आली आहे. इको, राइड, डॅश आणि सोनी या चार मोडमध्ये गाडी सादर करण्यात आली असून सिटची उंची 770 एमएम इतकी आहे. या गाडीत आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये 5जी ई-सीम, वायफाय आणि ब्लू टूथ सारख्या सुविधा असणार आहेत. 7 इंचाचा टच स्क्रिन डॅशबोर्डदेखील दिला असून टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टीम, रॅपिड ब्रेकिंग आणि पार्क असिस्ट फंक्शन अशा सुविधा देखील पहायला मिळतात.

चार रंगात येणार गाडी

ब्रेझेन ब्लॅक, ग्रेस व्हाईट, अजूर ब्लू आणि नामा रेड या चार रंगामध्ये ही स्कूटर सादर करण्यात आली असून बेंगळूर, गोवा, पुणे, विजयवाडा, हैद्राबाद, विझाग, कोची आणि मंगळूर येथील 15हून अधिक शोरुम्समध्ये ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article