For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिमर भाटिया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
सिमर भाटिया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
Advertisement

चित्रपटसृष्टीत वेळावेळी स्टारकिड्स आणि नेपोटिजमवर चर्चा होत असते. परंतु त्यासंबंधीचे आकर्षण चाहते तसेच निर्मात्यांमध्ये देखील कमी झालेले नाही. अमिताभ बच्चन यांचा यानतू अगस्त्य नंदाने मागील वर्षी ‘द आर्चीज’ या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नसला तरीही अगस्त्यच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. ओटीटीनंतर अगस्त्य आता मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटात तो एका रियल लाइफ हीरोची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूडच्या सुपरस्टार्सची भाची अभिनेत्री म्हणून झळकणार आहे. श्रीराम राघवन यांच्या ‘इक्कीस’ या चित्रपटात अगस्त्य मुख्य भूमिका साकारतोय. हा चित्रपट 1971 मधील भारत-पाकिस्तानच्या युद्धावर आधारित आहे. सर्वात युवा परमवीर चक्रविजेते लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला असणार आहे. सुहाना खान आणि खुशी कपूरसोबत काम केल्यावर अगस्त्य आता अभिनेता अक्षय कुमारची भाची सिमर भाटियासोबत झळकणार आहे. सिमरचा हा पदार्पणाचा चित्रपट ठरणार आहे. अभिनेत्री म्हणून कारकीर्द निर्माण करण्याचे स्वप्न सिमरने बाळगले आहे. सिमरची भूमिका छोटी परंतु महत्त्वपूर्ण असल्याचे समजते. सिमर आणखी काही चित्रपटांमध्ये दिसून येऊ शकते.

Advertisement

Advertisement
Tags :

.