For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुकांत कदमला रौप्यपदक

06:22 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुकांत कदमला रौप्यपदक
Advertisement

वृत्तसंस्था/ सुराकर्ता (इंडोनेशिया)

Advertisement

येथे सुरु असलेल्या इंडोनेशिया आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू सुकांत कदमने रौप्यपदक पटकाविले. अंतिम सामन्यात सुकांतने इंडोनेशियाच्या सेटिवानचा पराभव केला.

या स्पर्धेत पुरुषांच्या एस. एल. 4 एकेरीच्या अंतिम सामन्यात सुकांत कदमने इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटिवानचा 21-14, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी दर्जेदार कामगिरी केली आहे. पुरुषांच्या एस. एल. 3 एकेरीमध्ये भारताच्या उमेश विक्रमने सुवर्ण तर नेहल गुप्ताने रौप्य आणि जगदिश डिलीने कांस्यपदक घेतले. महिलांच्या एस. एल. 3 एकेरीमध्ये भारताच्या मनदीप कौरने रौप्यपदक तर निरजने कांस्यपदक पटकाविले. एस. एच. 6 पुरुष एकेरीत भारताच्या शिवरंजनने रौप्यपदक, सुदर्शन मुत्तुस्वामीने कांस्यपदक, पुरुष एस. एल. 4 एकेरीत भारताच्या नवीन शिवकुमारने कांस्यपदक, पुरुष एस. यु. 5 एकेरीत ऋतिक रघुपतीने रौप्यपदक, महिला एस. यु. 5 एकेरीत भारताच्या कोशिका देवडाने कांस्यपदक, एस. एल. 3 - एस. एल. 4 मिश्र दुहेरीत नेहल गुप्ता आणि नवीन शिवकुमार यांनी रौप्यपदक तर उमेश आणि सुर्या तसेच हर्षित आणि कार्तिक यांनी कांस्यपदके मिळवली.

Advertisement

Advertisement
Tags :

.