For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीरज चोप्राला रौप्यपदक

01:44 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
नीरज चोप्राला रौप्यपदक
Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 89.45 मी भाला फेक : पाकिस्तानच्या अर्शद नदीमला ऑलिम्पिक रेकॉर्डसह गोल्ड

Advertisement

वृत्तसंस्था /पॅरिस

भारताचा दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने हंगामातील सर्वोत्तम 89.45 स्कोअर केला व मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली. त्याचे बाकीचे थ्रो फाऊल होते. या कामगिरीसह सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये त्याने पदक मिळवले आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर भालाफेकसह सुवर्णपदक जिंकले.  अर्शदने 6 पैकी 2 थ्रो 90 पेक्षा जास्त फेकले. विशेष म्हणजे, नदीमने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीसह ऑलिम्पिक विक्रम केला. नदीमने टाकलेला थ्रो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब थ्रो ठरला. ग्रेनेडाच्या पीटर्स अँडरसनने कांस्यपदक पटकावले.

Advertisement

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. यामुळे संपूर्ण भारतीयांच्या नजरा पॅरिस ऑलिम्पिककडे लागल्या होत्या. नीरजने पात्रता फेरीत 89.34 मीटर दूर भाला फेकत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्याचा हा या हंगामातील सर्वोत्कृष्ट थ्रो ठरलेला. यामुळे भारतातील कोट्यावधी चाहत्यांच्या आशा नीरज चोप्राकडून होत्या. गुरुवारी रात्री भालाफेकची अंतिम फेरी पडली. नीरजच्या अंतिम फेरीची सुरुवात निराशाजनक झाली. नीरज समोर प्रमुख आव्हान असलेल्या अँडरसन पीटर्सने पहिल्या प्रयत्नात 85 मीटर पेक्षा कमी अंतरावर पहिला थ्रो टाकला. त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या वॉलकॉटनं पहिल्या प्रयत्नात 86.16 मीटर भाला फेकला. यानंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. जर्मनीच्या वेबरचा पहिला प्रयत्न देखील अपयशी ठरला. केनियाच्या येगोने पहिल्या प्रयत्नात 80.29 मीटर भाला फेकला. नीरजने पहिला थ्रो फाऊल टाकला.

नदीमचे ऑलिम्पिक रेकॉर्ड, नीरज दुसऱ्या स्थानी

पाकिस्तानच्या अर्शद नदीमने दुसऱ्या प्रयत्नात 92.97 मीटर थ्रो टाकला. जर्मनीच्या वेबरनं दुसऱ्या प्रयत्नात 87.33 मीटर थ्रो तर केनियाच्या येगोनं दुसऱ्या प्रयत्नात 87.72 मीटर थ्रो टाकला. नीरज चोप्राने दुसऱ्या प्रयत्नात 89.45 मीटर थ्रो टाकत दुसरे स्थान मिळवले. यानंतर नीरजला तिस्रया प्रयत्नात अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही व त्याचा फाऊल गेला. यानंतर नीरजचा चौथा, पाचवा व सहावा प्रयत्नही फाऊल गेला. यानंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने शेवटचा थ्रो 91 मीटरपेक्षा अधिक टाकला व सुवर्णपदकावर कब्जा केला.

Advertisement
Tags :

.