महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारताच्या भवतेग सिंग गिलला रौप्यपदक

06:28 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ज्युनियर वर्ल्ड कप नेमबाजी : बेंजामिन केलरला सुवर्ण, जॉर्डन सॅपला कांस्यपदक,

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताचा नेमबाज भवतेग सिंग गिलने इटलीतील पॉरपेटो येथे झालेल्या आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. पुरुषांच्या स्कीट नेमबाजीत त्याने हे पदक मिळविले. भारताचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक आहे. याआधी शबीरा हॅरिसने कनिष्ठ महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत कांस्यपदक मिळविले होते.

गेल्या वर्षी ज्युनियर आशियाई चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदक मिळविले होते. त्याने येथील सहा नेमबाजांचा सहभाग असलेल्या अंतिम फेरीत 52 गुण नोंदवत दुसरे स्थान मिळविले. अमेरिकेच्या बेंजामिन केलरने 60 पैकी 56 गुण नोंदवत सुवर्ण पटकावले तर अमेरिकेच्या जॉर्डन सॅपने कांस्यपदक मिळविले. दोन पदकांसह भारताने या स्पर्धेत अमेरिका, इटलीनंतर तिसरे स्थान मिळविले.

पात्रता फेरीच्या शेवटच्या दोन राऊंडमध्ये भवतेग सिंगने 121 गुण घेत पाचवे स्थान मिळवित अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. अमेरिकेच्या जॉर्डन सॅपने पात्रता फेरीत सर्वाधिक 125 गुण नोंदवत अव्वल स्थान मिळविताना ज्युनियर वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली होती. पात्रतेतील सहाव्या स्थानासाठी चार जणांनी 120 गुण मिळविल्याने त्यांच्या शूटऑफ घेण्यात आले. पहिल्या राऊंडमध्ये भवतेग सिंगने सॅप व लिथुआनियाचा टॉमस वैतेकुनास यांच्यासह संयुक्त दुसरे स्थान मिळविले होते. प्रत्येकाचे तीनदा टार्गेट चुकले होते. केलरने मात्र सर्व 20 गुण नोंदवत पहिले स्थान मिळविले होते.

अंतिम फेरीत 20 पैकी 20 गुण नोंदवत केलरला गाठले. या फेरीत केलरचे तीन टार्गेट चुकले. मात्र भवतेगने आपले पदक निश्चित केले होते. सॅपची मात्र घसरण झाल्याने त्याला कांस्यपदकासाठी खेळावे लागले. भवतेगने नंतर चांगले प्रदर्शन करीत रौप्यपदक निश्चित केले तर केलरला सुवर्ण मिळाले.

पुरुषांच्या स्कीट प्रकारात भारताच्या झोरावर बेदीने 115, मुनेक बत्तुलाने 113 यांना अनुक्रमे 26 व 33 वे स्थान मिळाले. ज्युनियर महिलांच्या स्कीटमध्ये संजना सूदने भारतातर्फे सर्वोत्तम प्रदर्शन केले. तिने 114 गुण घेत एकंदर 10 वे स्थान मिळविले. वंशिका तिवारीने 112 व झहरा दीसावालाने 101 गुणांसह 13 व 36 वे स्थान मिळविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article