कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रजत तोरसकरला अश्वमेघ टेबल टेनिस स्पर्धेत रौप्य पदक

05:09 PM Jan 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मालवण / प्रतिनिधी
टेबल टेनिस खेळाच्या आंतर विद्यापीठ अश्वमेघ राज्य स्पर्धा नुकत्याच नागपुर (१२-१४ जानेवारी २०२४) येथे पार पडल्या.सदरच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विद्यापीठांनी भाग घेतला होता.कु.रजत तोरसकर व त्याच्या संघाने सदरच्या स्पर्धेमध्ये नागपूर विभागातील संत तुकडोजी महाराज विद्यापीठचे प्रतिनिधित्व केले.अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नागपूर संघाने अतिशय उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश केला व रौप्य पदक पटकावले.तर पुणे येथील विद्यापीठ सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.कु.रजत रविकिरण तोरसकर हा मालवण येथील टोपीवाला हायस्कूल आणि स.का पाटील महाविद्यालय याचा माजी विद्यार्थी आहे.नुकत्याच झालेल्या भोपाळ येथील टेबल टेनिस च्या विद्यापीठीय राष्ट्रीय विभागीय स्पर्धा मध्ये कांस्य पदक मिळवले होते त्यामुळे त्याला खेलो इंडिया स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# rajat toraskar # malvan # silver medal #
Next Article