For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

खुशबूला रौप्य तर धिनिधीला कांस्य

06:07 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
खुशबूला रौप्य तर धिनिधीला कांस्य
Advertisement

वृत्तसंस्था, डकार (सेनेगल)

Advertisement

येथे सुरू असलेल्या युवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताची खुशबू रजकभाईने ज्युडोमध्ये रौप्यपदक तर धिनिधी देसिंघूने जलतरणात कांस्यपदक पटकाविले.

15 वर्षीय खुशबू रजकभाईला ज्युडो या क्रीडा प्रकारातील महिलांच्या 63 किलो वजन गटात झालेल्या अंतिम लढतीत जर्मनीच्या जोलिना रेनहोल्डकडून केवळ 48 सेकंदात पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे खुशबूला रौप्य तर जोलिनाला सुवर्णपदक मिळाले. गुजरातच्या खुशबूने या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली. सदर स्पर्धेत पदक मिळविणारी खुशबू ही भारताची दुसरी ज्युडोपटू ठरली आहे. 2018 च्या ब्युनोस ऐरीस येथे झालेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या थांगजम तबाबी देवीने महिलांच्या 44 किलो वजन गटात रौप्यपदक मिळविले होते.

Advertisement

महिलांच्या 100 मी. फ्रिस्टाईल जलतरण प्रकारात बेंगळूरच्या 16 वर्षीय धिनिधीने 56.27 सेकंदांचा अवधी घेत तिसऱ्या स्थानासह कांस्यपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात क्रोएशियाच्या अॅना बोबानोव्हीकने सुवर्ण तर न्यूझीलंडच्या अॅलीसा लॉसनने रौप्यपदक मिळविले

Advertisement
Tags :

.