For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळेमुळे मनपात शुकशुकाट

11:02 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळेमुळे मनपात शुकशुकाट
Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणूक असल्याने महानगरपालिकेतील तसेच इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. बुधवारी बी. के. मॉडेल स्कूल येथे या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यामुळे महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी त्या कार्यशाळेला गेल्याने मनपामध्ये शुकशुकाट पसरला होता. कर्मचारी व अधिकारी नसल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांसाठी रिकाम्या हाती परतावे लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. मतदान कशा प्रकारे घ्यायचे, याचबरोबर मतमोजणी कशा प्रकारे करायची, याची माहिती या कार्यशाळेमधून दिली जात आहे. याचबरोबर जनजागृती करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना रॅली काढावी लागत आहे. या निवडणुकीच्या कामामुळे दैनंदिन कार्यावर मात्र त्याचा मोठा परिणाम झाला आहे. बुधवारी कार्यशाळा असल्याने सर्वच कर्मचारी कार्यशाळेसाठी गेले होते. त्यामुळे महापालिकेमध्ये एक-दोन कर्मचारी वगळता सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना मात्र माघारी फिरावे लागले. यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.