सिकदंर शेखने मारले बैलहोंगल मैदान
बाळेकुंद्री /भरत कडोलकर
पंचवीस हजाराहून अधिक कुस्ती शौकीनांच्या साक्षीने महाराष्ट्र केसरी किताब मिळविणाऱ्या सिकदंर शेखने पंजाबचा भारत केसरी हितेश काला याला अवघ्या कांही मिनिटातच एकचाकी डावावर चारीमुंडी चितपट करून उपस्थित कुस्ती शौकीनांची वाहवा मिळविली. बैलहोंगल येथील प्रसिध्द मरडी बसवेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त गुरूवारी रोजी सांयकाळी 4 वाजता येथील कला आणि क्रीडा वेदिकेच्या वतीने मरडी बसवेश्वर कुस्ती मैदानात भव्य निकाली कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रकेसरी मल्ल सिकदंर शेख याने पंजाबचा भारत केसरी हितेश काला यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती प्रमुख पाहुणे बैलहौगलचे आमदार महांतेश कौजलगी. वेदमूर्ती महातंय्या शास्त्राa आरादीमठ. सन्नबसाप्पा कुडसोमन्नावर. बाबू कुडसोमन्नावर यांच्या हस्ते लावण्यात आली. यावेळी रामलिंग कुडसोमन्नावर, शंकरप्पा तुरमूरी चन्नाप्पा बेटगिरी. मल्लिकार्जून मूरबद. शंकरप्पा कडकोळ अशोक मत्तीकोप्प.वीरान्ना सालीमठ शिवू बेळगांवी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी दोन्ही मल्लांनी परस्परांच्या ताकदीचा अंदाज घेतला. सिकदंर शेखने संधीचा फायदा घेत हुशारीने एकचाकी डावावर पंजाबचा भारत केसरी मल्ल हितेश काला याला चारीमुंडी चितपट केले.
दुसऱ्या क्रमाकांची कुस्ती महाराष्ट्रचा चॅम्पियन मल्ल जय जाधव विरूध्द बेळगावचा पैलवान संजू इंगळगी यांच्यातील लढत सुमारे एक तास कुस्ती रंगली होती. परंतु उशीर झाल्याने सदर कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तिसरी लढत बेळगांव कंग्राळीचा पैलवान पार्थ पाटील. याने नेशनल पैलवान रामू पवार याला अस्मान दाखविले. चौथ्या क्रमांकाच्या लढतीत बैलहौगलचा पैलवान अर्हान याने ओंकार गुडकीवर विजय मिळविला. बैलहौगलच्या धुवने धनंजयलाला पराजित केले. बैलहौगल सिध्दूने धारवाडच्या बसवराजवर विजय मिळविला.चिक्कबागेवाडीचा शंकर व इंडीचा अशोक यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. गुरूवारी रार्त्री उशिरा झालेल्या निकाली कुस्ती मैदानात बेळगाव, कोल्हापूर, धारवाड, मुधोळ, सांगली दावणगिरी, कक्केरी, अथणी, रायबाग, खानापूर, बिडा,r चिक्कोडी जमखंडी विविध भागातून सुमारे 50 मल्लांनी आपला सहभाग दर्शविला. या आखाड्यात पंच म्हणून सिद्राय बसापा होटी. बसाप्पा कुडसोमन्नावर मडीवाळप्प होटी. बसापा बैलवाड यानी काम पाहिले दुंडाप्पा अक्की यानी समालोचन केले.