For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोलापूरचा सिकंदर शेख रुस्तुम ए हिंद किताबाचा मानकरी.

06:04 AM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोलापूरचा सिकंदर शेख रुस्तुम ए हिंद किताबाचा मानकरी
Advertisement

मानाचा किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा मल्ल

Advertisement

फिरोज मुलाणी/ औंध वार्ताहर

मानाच्या किताबासाठी सुरू असलेल्या चुरशीच्या लढतीत क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा... जय पराजयाचे खालीवर होणारे पारडे यामुळे कोण बाजीगर ठरणार याचे उत्तर महाराष्ट्रातील तगडा मल्ल सिकंदर शेख याने बग्गा कोहलीला धूळ चारुन दिले. रोमहर्षक लढतीत मानाचा ’रुस्तम-ए-हिंद’ त्याने पटकावला. सिकंदरच्या विजयानंतर त्याच्या चाहत्यांनी जल्लोष केला. आयोजकांनी मानाची गदा, ट्रॅक्टर व रोख  बक्षिस देऊन त्याचा गौरव केला.

Advertisement

पंजाब येथे ऊपनगर जिह्यातील जांदला येथे ’ऊस्तम-ए-हिंद 2024’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऊस्तुम ए हिंद लाल मातीच्या कुस्तीतील देशातील मानाचा किताब मानला जातो. त्यामुळे स्पर्धेत देशभरातील अव्वल दर्जाचे दिग्गज   मल्ल सहभागी झाले होते. उपांत्य फेरीत सिकंदरने रोशन किरलगड सारख्या तुफानी मल्लास पराभवाचे पाणी पाजून अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम फेरीत पंजाबच्या बग्गा कोहली या तगड्या मल्लांशी त्याचा मुकाबला 24 मिनिटे रंगला होता. ताबा घेण्याचा बग्गीचा प्रयत्न सिकंदरने उधळून लावला. एकेरी पट काढून बग्गी सिकंदरला चितपट करण्याच्या प्रयत्नात असताना सिकंदरने चपळाईने खालून डंकी मारली. क्षणात समोऊन झोळी बांधून अटीतटीच्या लढतीत  बग्गा कोहलीला आसमान दाखवून ’ऊस्तम-ए-हिंद’ हा किताब आपल्या नावे केला. मूळचा सोलापूर जिह्यातील सांगोला येथील सिकंदरने कुस्ती पंढरीच्या गंगावेस तालमीत अनेक वर्षे सराव केला आहे. राज्यातील मल्लापुढे दंड थोपटण्राया उत्तर भारतातील अनेक दिग्गज मल्लांना सिकंदरने दिल्ली पंजाब हरियाणा येथे जाऊन पराभावाचे पाणी पाजून कोल्हापूरी हिसका दाखवला आहे.जय-पराजयाची कसलीही तमा न बाळगता बिनधास्त कुस्ती करण्याची त्याची खासियत अनेकांना आवडते त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर त्याचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

रुस्तुम ए हिंद मानाचा किताब महाराष्ट्रातील हरिश्चंद्र बिराजदार, अमोल बुचडे आणि असाब अहमद या तीन मल्लांनी जिंकला होता.सिकंदर हा किताब जिंकणारा राज्यातील चौथा आहे. उत्तर भारतातील मल्लांचे या किताबावर वर्चस्व राहिले आहे. त्याच्या जिगरबाज  कामगिरीचे महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांनी कौतुक केले आहे.

पुनीत बालन ग्रुपने केला सन्मान

पुनीत बालन ग्रुपचा खेळाडू सिकंदर शेख यांने ऊस्तुम ए हिंद किताब जिकंताच आनंद व्यक्त केला. पुणे येथे पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष युवा उद्योजक पुनीत बालन यांनी सिकंदरचा यथोचित सत्कार कऊन त्याच्या वाटचालीत पाठबळ दिले.

Advertisement
Tags :

.