कोकणात मोठ्या प्रकल्पांची चाहूल; पण अंमलबजावणीची कसोटी
कोकणातील तऊण रोजगारासाठी मुंबई-पुण्याची वाट धरतो, ही वर्षानुवर्षांची वस्तुस्थिती आहे. आता मात्र पर्यटन, उद्योग, बंदर विकास आणि शिप रिपेअरिंगच्या माध्यमातून कोकणातच रोजगारनिर्मिती करून ‘रिव्हर्स मायग्रेशन’ घडविण्याची चर्चा सुरू झाली आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील नव्या प्रकल्पांमुळे रोजगार निर्मितीची आशा निर्माण झाली असली, तरी कोकणाला आता घोषणा नकोत, प्रत्यक्ष रोजगार हवा आहे. त्यामुळे घोषणा आणि प्रत्यक्ष रोजगार यातील अंतर भरून काढणे हेच मोठे आव्हान आहे.
को कणातील निसर्ग, समुद्र, डोंगर, आंबा-काजूच्या बागा आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यामुळे हा प्रदेश वेगळा आहे. मात्र, या संपन्नतेच्या तुलनेत रोजगाराच्या संधींची कमतरता ही कोकणाची जुनी समस्या आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे जाणारा कोकणी तऊण हे गेल्या अनेक दशकांपासूनचे चित्र आहे. गावातील घरे बंद पडत गेली अन् शहरांमध्ये कोकणातील तऊणांची गर्दी वाढत गेली.
आता हे चित्र बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे. पर्यटन, उद्योग, बंदरे, जहाजबांधणी, जहाज दुऊस्ती, इलेक्ट्रिक बोट निर्मिती, औद्योगिक क्षेत्र आणि विविध पायाभूत प्रकल्पांच्या माध्यमातून कोकणात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्यात प्रस्तावित आणि जाहीर झालेल्या प्रकल्पांमुळे स्थानिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, या अपेक्षांचे रुपांतर प्रत्यक्ष रोजगारात होते का, हीच आता खरी कसोटी आहे.
शिरोडा-वेळागर येथे पंचतारांकित हॉटेल प्रकल्पासाठी करार झाल्याची माहिती आहे. कुणकेश्वर येथे ताज समूहाच्या 50 खोल्यांच्या ‘ट्री ऑफ लाईफ’ रिसॉर्ट प्रकल्पाचीही घोषणा झाली आहे. पर्यटनाच्यादृष्टीने हे प्रकल्प महत्त्वाचे ठरू शकतात. मात्र, त्यांचा फायदा केवळ हॉटेलच्या काही नोकऱ्यांपुरता मर्यादित राहता कामा नये. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपासून टॅक्सीचालक, स्थानिक गाईड, होमस्टे चालक, खानावळ व्यावसायिक, शेतकरी, मत्स्य व्यावसायिक, हस्तकला कारागिर आणि स्थानिक पुरवठादारांपर्यंत त्याचा आर्थिक लाभ पोहोचला पाहिजे.
पर्यटन प्रकल्प उभा राहिला, की स्थानिक आंबा, काजू, कोकम, नारळ, मासळी, भाजीपाला, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि हस्तकलेला बाजार मिळू शकतो. मात्र, त्यासाठी स्थानिक उत्पादकांना त्या प्रकल्पांच्या पुरवठा साखळीत जोडण्याचे नियोजन आवश्यक आहे. अन्यथा प्रकल्प कोकणात आणि पुरवठा करणारे उद्योग बाहेरचे, अशी विसंगत परिस्थिती निर्माण होऊ शकते.
जहाजबांधणी, जहाज दुऊस्ती, शिप रिपेअरिंग, इलेक्ट्रिक बोट निर्मिती आणि औद्योगिक क्षेत्राचा विस्तार ही कोकणासाठी रोजगार निर्मितीची मोठी संधी ठरू शकते. या क्षेत्रांमध्ये वेल्डिंग, फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, मशीन ऑपरेशन, डिझाईन, तंत्रज्ञान आणि देखभाल अशा विविध कौशल्यांची गरज असते. यामुळे प्रकल्प येण्यापूर्वीच स्थानिक तऊणांना आवश्यक कौशल्य देणे गरजेचे आहे. आयटीआय, पॉलिटेक्निक, कौशल्य विकास केंद्रे आणि उद्योग यांच्यात थेट समन्वय निर्माण झाला पाहिजे. कोणता उद्योग येणार आहे, त्याला कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ लागणार आहे आणि त्या रोजगारासाठी स्थानिक तऊणांना कोणते प्रशिक्षण द्यावे लागेल, याचे नियोजन आधी झाले पाहिजे. कारण कौशल्याचा अभाव राहिला, तर उद्योग कोकणात येतील; मात्र रोजगारासाठी मनुष्यबळ मुंबई, पुणे किंवा अन्य भागांतून आणले जाईल. अशावेळी प्रकल्प आला, तरी स्थानिक तऊणांच्या स्थलांतराचा प्रश्न कायम राहील. ‘रिव्हर्स मायग्रेशन’ची खरी सुऊवात स्थानिक तऊणाला प्रकल्पाच्या दारातच रोजगाराची संधी मिळाल्यापासून होईल.
शहरातून कोकणात परतण्यासाठी केवळ रोजगार पुरेसा नाही. तऊण आणि त्याचे कुटुंब कोकणात स्थायिक होऊ शकेल, असे जीवनमान निर्माण करावे लागेल. दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, चांगले रस्ते, सार्वजनिक वाहतूक, अखंडित वीज, वेगवान इंटरनेट, परवडणारी घरे आणि सुरक्षित सामाजिक वातावरण या मूलभूत गरजा आहेत.
‘वर्क फ्रॉम कोकण’ ही संकल्पनाही मोठ्या प्रमाणावर विकसित करता येऊ शकते. को-वर्किंग सेंटर, डिजिटल सेवा, इंटरनेट आधारित व्यवसाय, स्थानिक स्टार्टअप्स, फ्रीलान्सिंग आणि लघुउद्योजकतेला चालना दिल्यास शहरात नोकरी करण्याची गरज नसलेल्या तऊणांसाठी कोकणातच नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कोकणाचा विकास करताना पर्यावरणाचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. समुद्र किनारे, खाड्या, डोंगर, जंगल, जैवविविधता आणि शेती हीच कोकणाची खरी ताकद आहे. पर्यटन आणि उद्योगाच्या नावाखाली या नैसर्गिक संपत्तीवर अतिरेकी ताण आला, तर विकासाच्या प्रक्रियेत कोकणाची ओळखच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधणारा विकास आवश्यक आहे. स्थानिकांचा सहभाग, पर्यावरणीय नियमांचे पालन आणि शाश्वत पर्यटनाला प्राधान्य देऊनच मोठ्या प्रकल्पांची उभारणी झाली पाहिजे.
कोकणाने यापूर्वी अनेक प्रकल्पांच्या घोषणा ऐकल्या आहेत. त्यामुळे आता केवळ ‘प्रकल्प मंजूर झाला’, ‘करार झाला’ किंवा ‘भूमिपूजन झाले’ यावर समाधान मानण्याची वेळ गेलेली आहे. खरा प्रश्न वेगळा आहे. तो म्हणजे काम प्रत्यक्ष सुरू झाले का? किती रोजगार निर्माण झाले? त्यापैकी किती रोजगार स्थानिकांना मिळाले? स्थानिक उद्योग किती जोडले गेले? किती तऊणांना कौशल्य प्रशिक्षण मिळाले? या प्रश्नांची उत्तरेच कोकणाच्या विकासाचे खरे मोजमाप ठरणार आहेत.
मोठा प्रकल्प कोकणात येणे ही निश्चितच सुऊवात आहे; पण त्या प्रकल्पाच्या रोजगाराच्या संधींमध्ये कोकणी तऊणाचा वाटा निर्माण होणे हा विकासाचा खरा टप्पा आहे. शासनाने प्रकल्प आणण्याबरोबरच स्थानिक रोजगार, कौशल्य प्रशिक्षण, स्थानिक व्यवसाय आणि उत्तम जीवनमान या चारही घटकांची सांगड घातली, तर मुंबई-पुण्याची वाट धरलेला तऊण पुन्हा आपल्या गावाकडे वळू शकतो. कोकणाला आता केवळ आश्वासनांची आणि घोषणांची गरज नाही. हाताला काम, कामाला योग्य मोबदला आणि गावातच चांगले जीवनमान हवे आहे. कारण प्रश्न केवळ प्रकल्प कोकणात येण्याचा नाही, प्रश्न आहे, त्या प्रकल्पात कोकणी तऊणासाठी किती जागा आहेत हा. त्यामुळे फक्त प्रकल्प नकोत, प्रकल्पांमध्ये कोकणी तऊणांना हक्काचा वाटा हवा आहे.
संदीप गावडे
