For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्याजदरात अर्धा टक्का कपात होण्याचे संकेत

06:20 AM Jan 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
व्याजदरात अर्धा टक्का कपात होण्याचे संकेत
Advertisement

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालात माहिती : आरबीआय कऊ शकते कपात

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

महागाई नियंत्रणासोबतच मागणी कमी होण्याच्या पार्श्वभूमीवर देशातील केंद्रिय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या वर्षी व्याजदरामध्ये अर्धा टक्का इतकी कपात करु शकते, असा अंदाज नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज यांच्या अहवालामधून व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

डिसेंबरमध्ये 1.3 टक्के महागाई दर

डिसेंबरमध्ये महागाई दर थोडासा वाढून 1.3 टक्के इतका झाला आहे. नोव्हेंबरमध्ये हा दर 0.7 टक्के इतका होता. अपेक्षेप्रमाणे यावेळेला महागाई दरामध्ये वाढ झाली असून खाण्यापिण्याच्या वस्तुंच्या किंमती हळुहळू सामान्य होत आहेत. विशेषत: भाज्यांच्या किंमती पहिल्यापेक्षा जास्त कमी झालेल्या नाहीत. त्यामुळेच महागाई काहीशी वाढलेली आहे, असे नुवामाने म्हटले आहे. डिसेंबरमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तुंचा महागाई दर उणे 1.98 टक्के इतका होता. याआधीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तो उणे 2.8 टक्के इतका होता. याचाच अर्थ भाज्यांच्या दरामध्ये आधींच्या तुलनेमध्ये फारशी घसरण झालेली नाही. नुवामाच्या मते येणाऱ्या महिन्यांमध्ये भाज्यांचे दर आटोक्यात राहतील. त्यामुळे महागाई काहीशी वाढू शकते. तरीही रिझर्व्ह बँकेला अशा परिस्थितीतही व्याजदर कपात करण्यासाठी पुरेशी संधी असणार असल्याचे नुवामाने म्हटले आहे.

का होणार कपात

देशांतील लोकांचे उपन्न आणि कंपन्यांचा नफा कमी नोंदविला गेला असून जगभरामध्ये अनिश्चितता दिसून येते आहे. जागतिक अनिश्चिततेमध्ये भारताच्या निर्यातीवर प्रभाव पडताना दिसतो आहे. जेंव्हा महागाई नियंत्रणात असते आणि अर्थव्यवस्था धिमी असते तेंव्हा केंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाव ते अर्धा टक्का इतकी कपात करण्याची संधी असते, असेही नुवामाने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.