लेलँडच्या व्यवहारांमध्ये फेरबदलाचे संकेत
ईयू-ब्रिटन व्यवसायांचा यात समावेश :अध्यक्ष धीरज हिंदुजा यांची माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हिंदुजा ग्रुपची प्रमुख भारतीय कंपनी अशोक लेलँड, युरोपियन युनियन (ईयू) आणि युके सोबतच्या मुक्त व्यापार करारांच्या पार्श्वभूमीवर ईयू आणि युकेमध्ये त्यांच्या व्यवसाय धोरणात बदल करू शकते. कंपनीचे अध्यक्ष धीरज हिंदुजा यांनी ही माहिती दिली आहे.
यूकेमधील त्यांच्या ईव्ही कंपनी स्विच मोबिलिटीचे एक युनिट बंद केल्यानंतर, कंपनी इलेक्ट्रिक बसेसचा उत्पादन बेस यूकेहून युएईमधील रस अल खैमाह येथे हलविण्याच्या प्रक्रियेत होती. ते सौदी अरेबियामध्ये एक उत्पादन युनिट स्थापन करण्याच्या प्रक्रियेत देखील आहे. भारताने अंतिम केलेल्या व्यापार करारांमुळे, कंपनी आता ईयू आणि युके बाजारपेठेत थेट निर्यात करण्याची शक्यता पाहत आहे.
हिंदुजा यांनी सांगितले, ‘आमची आकांक्षा युरोपियन बाजारपेठेत विकसित होण्याची आहे. एक नवीन मॉडेल इ 1 असून आरएकेमधून वाहन निर्यात करण्याचा हेतू होता.
खर्चाचे निकष घेऊन पर्यायी विचार
गल्फ कोऑपरेशन कौन्सिल प्रदेशातील वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी या योजनेचा विचार करत आहे. आरएकेचे युनिट आधीच 6,000 वाहनांच्या पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.