टाटाच्या समभागात मोठी वाढ
वृत्तसंस्था, मुंबई
मंगळवारी टाटा ग्रुपच्या समभागांमध्ये जोरदार खरेदी दिसून आली. टाटा केमिकल्सचे शेअर्स सुमारे 20 टक्क्यांनी, तर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे शेअर्स सुमारे 15 टक्क्यांनी वाढले. ग्रुपच्या इतर अनेक समभागांमध्येही 3 ते 5 टक्क्यांनी वाढ झाली.
टाटा ग्रुपच्या समभागांमधील ही तेजी अशा वेळी आली आहे, जेव्हा शेअर बाजारात टाटा सन्सच्या लिस्टिंगबाबतची चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेने टाटा सन्सचा अर्ज फेटाळला आहे, ज्यामध्ये कंपनीने चीफ इन्व्हेस्टमेंट कंपना म्हणून आपली नोंदणी रद्द करण्यासाठी मंजुरी मागितली होती. यानंतर, टाटा सन्ससाठी लिस्टिंग टाळणे कठीण होऊ शकते, असे मानले जात आहे.
बीएसईवर टाटा केमिकल्सचे समभाग 20 टक्क्यांनी वाढून सुमारे 735 रुपयांवर पोहोचले. टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे समभाग सुमारे 15 टक्क्यांनी वाढून 750 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. याशिवाय, टीसीएस, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, टाटा टेक्नॉलॉजीज आणि टाटा अलेक्सीच्या समभागांमध्येही सुमारे 3 ते 5 टक्क्यांची वाढ दिसून आली. याच काळात सेन्सेक्स सुमारे 0.4 टक्क्यांनी वधारला होता.
टाटा सन्सच्या लिस्टिंगची चर्चा का?
या तेजीचे सर्वात मोठे कारण म्हणजे टाटा सन्सची संभाव्य लिस्टिंग. वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेने टाटा सन्सचा सीआयसी नोंदणी रद्द करण्याचा अर्ज स्वीकारलेला नाही. यानंतर, बाजारात अशी अपेक्षा वाढली आहे की टाटा सन्सला अखेरीस शेअर बाजारात सूचीबद्ध व्हावे लागेल. तथापि, लिस्टिंगची स्थिती अद्याप स्पष्ट नाही. पुढील कायदेशीर आणि कंपनीच्या रचनेसंबंधित पावले उचलण्याची आवश्यकता असू शकते.
टाटा सन्समध्ये हिस्सेदारी किती आहे?
टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्ट्सची सर्वात मोठी हिस्सेदारी आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांच्या नेतृत्वाखालील टाटा ट्रस्ट्सकडे कंपनीमध्ये सुमारे 66 टक्के हिस्सेदारी आहे. त्याच वेळी, शापूरजी पालोनजी ग्रुपची टाटा सन्समध्ये सुमारे 18.4 टक्के हिस्सेदारी आहे. हा ग्रुप ब्रयाच काळापासून टाटा सन्सच्या लिस्टिंगला पाठिंबा देत आहे. असे मानले जाते की, लिस्टिंगमुळे त्यांना आपली हिस्सेदारी विकून कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत होईल.