कोळसा उत्पादनात मोठी वाढ
सरकारकडून नवीन आकडेवारी सादर
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जुलै महिन्यात देशाचे कोळसा उत्पादन 7.5 टक्क्यांनी आणि वितरण 17 टक्क्यांनी वाढले. कोल इंडियाचे उत्पादनही मजबूत राहिले. भारताचे कोळसा उत्पादन जुलै 2025 मध्ये 7.51 टक्क्यांनी वाढून 697.5 लाख टन झाले, जे गेल्या वर्षी जुलैमध्ये 648.8 लाख टन होते. या महिन्यात कोळशाचे वितरण 17 टक्क्यांनी वाढून 863.3 लाख टन झाले, जे गेल्या वर्षी जुलैमध्ये 735.7 लाख टन होते.
कोळसा मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, ‘कोळसा उत्पादन आणि त्याच्या पुरवठ्यातील वाढ ही सर्व क्षेत्रांमध्ये अखंड पुरवठा आणि कार्यात्मक स्थिरता राखण्यासाठी कोळसा मंत्रालयाची सततची वचनबद्धता आणि प्रयत्न दर्शवते.‘
एप्रिल-जुलै 2026 दरम्यान देशाचे एकूण कोळसा उत्पादन 3,022.4 लाख टन होते, तर याच कालावधीत कोळशाचा एकूण पुरवठा 3,547 लाख टन होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीपेक्षा 5.87 टक्क्यांनी जास्त आहे. सरकारी मालकीच्या कोल इंडिया लिमिटेडचे जुलै महिन्यातील कोळसा उत्पादन 503.5 लाख टन होते, जे कंपनीच्या जुलै 2025 मधील उत्पादनापेक्षा 8.42 टक्क्यांनी जास्त आहे. सीआयएलने जुलै 2026 मध्ये 636.7 लाख टन कोळशाचा पुरवठा केला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील पुरवठ्यापेक्षा 17.43 टक्क्यांनी जास्त आहे. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये एप्रिल 2026 ते जुलै 2026 दरम्यान ण्घ्थ् चा एकूण पुरवठा देखील मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.81 टक्क्यांनी वाढला आहे.