वोडाफोनच्या ग्राहकसंख्येत लक्षणीय घट
रिलायन्स जिओची गाडी सुसाट : एप्रिल महिन्यातील चित्र
वृत्तसंस्था/ मुंबई
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी वोडाफोन आयडियाच्या ग्राहक संख्येमध्ये कमालीची घसरण झालेली दिसून आली आहे. या तुलनेमध्ये एप्रिल महिन्यात रिलायन्स जिओचे ग्राहक वाढलेले दिसले. लक्षात घ्या की वोडाफोन आयडियाच्या ग्राहक संख्येत गेल्या दोन महिन्यात घसरण अनुभवायला मिळाली आहे. परिणामी कंपनीची चिंता अधिक वाढली आहे.
वोडाफोनची घसरण थांबेना...
एप्रिल महिन्यात वोडाफोन आयडियाचे 6 लाख ग्राहक कमी झाले असून सक्रिय ग्राहकांची संख्या 11 लाख लाखापर्यंत राहिली. महिन्याच्या स्तरावर पाहता वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांमध्ये सातत्याने घसरण पहायला मिळते आहे. अलीकडेच कंपनीने मोठ्या शहरांमध्ये 4 जी आणि 5 जी सेवा राबवली आहे. या आधीच्या म्हणजे मार्च महिन्यात 5 लाख ग्राहक कंपनीने गमावले तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा 2 लाख ग्राहक कंपनीचे कमी झाले होते. ही एकंदर घसरण पाहता वोडाफोनचे ग्राहक मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे एकंदररीत्या दिसून येते. याचाच फायदा रिलायन्स, जिओ आणि भारती एअरटेल या इतर कंपन्यांनी उचलल्याचेही दुसरीकडे स्पष्ट झाले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार रिलायन्स जिओने 26 लाख ग्राहकांसह आघाडीवरचे स्थान एप्रिलमध्ये मिळवले. त्या पाठोपाठ भारती एअरटेलच्या ग्राहक संख्येमध्ये 2 लाख इतकी वाढ एप्रिल मध्ये झाली आहे.
वायरलेस, ब्रॉडबँडमध्ये रिलायन्स जिओ अग्रभागी
वायरलेस 5जी सेवा देण्यामध्ये रिलायन्सने बाजारात 81 टक्के इतका सर्वाधिक वाटा उचलला आहे. एप्रिल महिन्यात रिलायन्सने 0.57 दशलक्ष ग्राहक नव्याने जोडले तर याच व्यवसायामध्ये भारती एअरटेलने एप्रिल महिन्यात 0.16 दशलक्ष वायफाय 5 जी ग्राहक जोडले आहेत. कंपनीचा यायोगे बाजारातील वाटा 18 टक्के झाला आहे. एप्रिल 2025 मध्ये पाहता एकंदर भारतीय दूरसंचार क्षेत्रामध्ये 1.9 दशलक्ष ग्राहक नव्याने जोडले गेले आहेत. ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या पाहता 943.09 दशलक्षवर पोहोचली आहे. सक्रिय ग्राहकांची संख्या पाहता जिओने 5.5 दशलक्ष ग्राहकांसह आघाडीचे स्थान मिळवले आहे. या पाठोपाठ 4.1 दशलक्ष ग्राहकांसह भारती एअरटेल दुसऱ्या आणि वोडाफोन आयडिया 1.1 दशलक्ष ग्राहकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.