महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडियन ऑइलच्या नफ्यात लक्षणीय घट

07:00 AM May 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चौथ्या तिमाहीत 5487 कोटी कमावले : 49 टक्के नफा कमीच

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

तेल उत्पादक कंपनी इंडियन ऑइलने मार्च अखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून नफ्यामध्ये 49 टक्के इतकी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे इंडियन ऑइलच्या नफ्यावरती परिणाम झाल्याची माहिती देण्यात आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी मंगळवारी 30 एप्रिल रोजी आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीतील नफ्याच्या निकालाची माहिती दिली. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत इंडियन ऑइलने 5487 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे.

मागच्या वर्षी किती होता नफा

एक वर्षाच्या आधीच्या तुलनेमध्ये पाहता समान तिमाहीमध्ये इंडियन ऑइलने नफ्यामध्ये 49 टक्के म्हणजे जवळपास निम्मी घट नोंदवली आहे. सरकारी तेल रिटेलर कंपनी इंडियन ऑइलने मागच्या वर्षी मार्च अखेरच्या तिमाहीमध्ये 10 हजार 841 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला होता.

 तीन महिन्यात तेल झाले महाग

2024 च्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या म्हणजेच क्रूड ऑइलच्या किमतीमध्ये 16 टक्के इतकी वृद्धी नोंदवली गेली आहे. या वृद्धीचा परिणाम कंपनीच्या तिमाही निकालावर स्पष्टपणे दिसून आला आहे. डिसेंबर तिमाहीमध्ये पाहता इंडियन ऑइलने 9 हजार 224 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. दुसरीकडे मार्च अखेरच्या तिमाहीमध्ये इंडियन ऑइलने अल्पशा घसरणीसह 2.23 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article