For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशात कृषी विकासदरात लक्षणीय घट

06:50 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
देशात कृषी विकासदरात लक्षणीय घट
Advertisement

मान्सूनच्या लहरीपणाचा फटका : गेल्या 4-5 वर्षांतील सर्वात मोठी घसरण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

यंदाच्या पावसाळी हंगामात देशाच्या काही भागात अपेक्षित मान्सून न बरसल्याने देशातील कृषी विकासात मोठी घट झाली आहे. देशात मान्सूनच्या कमतरतेमुळे कृषी विकासदरात मोठी घट झाली आहे. 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत कृषी क्षेत्रातील विकासदर 3.5 टक्क्मयांवरून 1.2 टक्क्मयांवर घसरला आहे.

Advertisement

मान्सूनअभावी विविध राज्यांमध्ये पिकांच्या पेरण्या आणि सिंचनावर परिणाम झाला आहे. खरीप पिकांची पेरणी साधारणपणे जुलै-सप्टेंबरमध्ये केली जाते. त्याचबरोबर या दिवसात बहुतांश रब्बी पिके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतात. मात्र, 2023 मध्ये मान्सूनला विलंब झाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ऑक्टोबर 2023-24 च्या खरीप हंगामाच्या पहिल्या अंदाजानुसार, पावसामुळे बहुतांश पिकांसाठी परिस्थिती फारशी चांगली दिसत नाही. काही राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात आली आहे. तर उत्तरेकडील काही राज्यांमध्ये अतिरिक्त पावसामुळे शेतकऱ्यांच्या कृषी उत्पन्नाला नुकसानीचा फटका बसला आहे. मान्सूनअभावी होणारे नुकसान कमी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी कृषी उत्पन्न कमी झाल्यामुळे सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेने दुसऱ्या तिमाहीत आरबीआयच्या अंदाजांना मागे टाकले आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था 6.5 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीतील वाढ 7.8 टक्क्यांनी कमी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रात झपाट्याने वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. हे प्रमाण 13.9 टक्के वर पोहोचले असून गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 3.8 टक्क्यांची घसरण नोंद झाली आहे.

Advertisement
Tags :

.