Kolhapur News : कांडगाव शेळकेवाडी रस्त्यावर तीन गव्यांचे दर्शन!
01:43 PM Nov 19, 2025 IST
|
NEETA POTDAR
Advertisement
परिसरामध्ये भीतीचे वातावरण
Advertisement
वाशी : कांडगाव ते शेळकेवाडी दरम्यानच्या वास ओढा परिसरामध्ये मंगळवारी रात्री तीन गव्यांनी अचानक दर्शन दिल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले हे गवे महादेब शेळके व किरण शेळके यांच्या भटकी व टपाली नावाच्या शेतामध्ये गेले होते. ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Advertisement
रात्री सुमारे सात बाजण्याच्या सुमारास हे गवे रस्त्यालगत दिसून लगेचच महे दिशेने असलेल्या ऊसशेतीकडे निघून गेले. सकाळी शेतीकामांसाठी जाणाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन कांडगाव तलाठी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. वनविभागालाही याबाबत माहिती देण्यात आली असून परिसरात गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Advertisement
Next Article