कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भक्तीगीत नृत्यदिग्दर्शन स्पर्धेत सिद्धी घाडी विजेत्या

01:09 PM Nov 07, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आचरा रामेश्वर मंदिर येथे स्पर्धेचे आयोजन

Advertisement

आचरा | प्रतिनिधी
आचरा येथील इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिर येथे कार्तिकोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या आणि भजनी बुवा रवींद्र गुरव यांचा कल्पनेतून साकार झालेल्या जिल्ह्यात प्रथमच नोख्या अशा भक्तिगीतांच्या रेकॉर्डवर आधारित भक्तीगीत नृत्यदिग्दर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत प्रथम क्रमांक देऊळवाडी येथील विठ्ठल रखुमाई ग्रुपच्या सिद्धी घाडी यांनी पटकवला,द्वितीय क्रमांक दिव्यज्योत समई ग्रुप डोंगरेवाडी -स्नेहल देसाई, तृतीय क्रमांक ओमी ग्रुप डान्स -ओंकार परब यांनी प्राप्त केला. उत्तेजनार्थ म्हणून श्री ग्रुप वरचीवाडी- मिताली आचरेकर, शिवरामेश्वर ग्रुप आचरा - भावना मुणगेकर यांना प्राप्त केला. या स्पर्धेत जिल्हातील एकूण 13 सघांनी सहभाग दर्शवीला होता. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेचे उदघाट्न ओंकार मिराशी यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी जेरॉन फर्नांडीस, संतोष मिराशी, संजय मिराशी, अभय भोसले, जयप्रकाश परुळेकर, पंकज आचरेकर, मंदार सांबारी, फ्रफुल्ल घाडी, दशरथ घाडी, बाळा घाडी, मंदार सरजोशी, अजित घाडी, चंदू कदम, आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बाबू कदम, पंकज आचरेकर, यांनी मेहनत घेतली. स्पर्धेचे परीक्षण रवी कुडाळकर, दिशा नाईक यांनी केले. सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update# konkan update# achra # compitition# malvan # sindhudurg news#
Next Article